बिल्डरच्या मालमत्ता नोकरांच्या नावाने, प्राप्तिकरचे छापे तिसऱ्या दिवशीही सुरूच
By ऑनलाइन लोकमत | Published: June 28, 2019 05:36 AM2019-06-28T05:36:24+5:302019-06-28T05:36:48+5:30
नागपुरातील सहा पैकी पाच बिल्डरांवरील प्राप्तिकर खात्याचे छापे गुरुवारी तिस-या दिवशीही सुरू होते.
नागपूर - नागपुरातील सहा पैकी पाच बिल्डरांवरील प्राप्तिकर खात्याचे छापे गुरुवारी तिस-या दिवशीही सुरू होते. काल उशिरा रात्री अधिकाऱ्यांनी अॅड. चंद्रकांत पद्मावार यांच्याकडील कारवाई पूर्ण केली, या सहा बिल्डरांनी केलेले बेनामी व्यवहार २०० कोटींच्या घरात असावे, अशी माहिती सूत्रांनी दिली.
प्राप्तिकर अधिकाºयांनी आज कागदपत्रांची पडताळणी केली व उरलेले तीन बँक लॉकर्सही उघडले.
या लॉकरमधून जवळपास दोन
किलो सोन्याचे दागिने व
बेनामी संपत्तीची कागदपत्रे सापडले. महत्त्वाचे म्हणजे, या पाच बिल्डरपैकी एका बिल्डरने दोन जमिनी
आपल्या दोन नोकरांच्या नावाने खरेदी केल्याचे उघड झाले आहे. या मालमत्तांची एकूण किंमत अंदाजे २० कोटी आहे. बेनामी ट्रान्झॅक्शन (प्रोहिबिशन) अॅक्ट २०१६ या कायद्यानुसार बेनामी मालमत्ता सरकारजमा करण्याचा अधिकार प्राप्तिकर विभागाला आहे. अधिकाºयांनी या दोन्ही मालमत्ता ताब्यात घेतल्या आहे व दोन्ही नोकरांची चौकशी सुरू केली आहे.
आजच्या कारवाईमध्ये अतुल यमसनवार यांच्या आॅरेंज सिटी हाऊसिंग फायनान्सचा संचालक असलेल्या धंतोलीतील एका प्रख्यात बिल्डरचेही नाव समोर आले आहे. हा बिल्डर हा इतर सहा कंपन्यांचाही संचालक असून राजकीय वर्तुळात सक्रिय आहे. या बिल्डरचे यमसनवार यांच्याशी काय व्यावसायिक संबंध आहेत याचीही चौकशी प्राप्तिकर अधिकाºयांनी सुरू केल्याची माहिती सूत्रानी दिली.
सहाही बिल्डरांच्या घरात प्रोटेक्टड युनिट
प्राप्तिकर अधिकाºयांनी या सहाही बिल्डरांच्या घरात पी. यू. (प्रोटेक्टड युनिट) तयार केले आहेत. पी. यू. मध्ये घरातील एका खोलील जप्त केलेले दस्तावेज व इतर पुरावे ठेवले जातात व त्याला प्राप्तिकर खात्याचे अधिकारी कुलूप लावतात. या खोलीत केव्हाही येण्या-जाण्याचे अधिकार प्राप्तिकर खात्याच्या अधिकाºयांना असतात. प्रोटेक्टेड युनिट ही शेवटची कारवाई समजली जाते त्यामुळे या पाचही बिल्डरांवरील छापे आज उशिरा रात्रीपर्यंत संपण्याची शक्यता सूत्रांनी व्यक्त केली.