महाराष्ट्रातील फुलपाखरांना देणार मराठीत नाव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 1, 2019 12:30 AM2019-09-01T00:30:32+5:302019-09-01T00:31:34+5:30
सिव्हील लाईन्स येथील जैव विविधता भवनात महाराष्ट्र राज्य जैवविविधता मंडळाची बैठक आयोजित करण्यात आली. बैठकीत महाराष्ट्रातील फुलपाखरांना मराठीत नाव देण्यासह जैव विविधतेबाबतच्या महत्त्वाच्या विषयांवर चर्चा करण्यात आली.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : सिव्हील लाईन्स येथील जैव विविधता भवनात महाराष्ट्र राज्य जैवविविधता मंडळाची बैठक आयोजित करण्यात आली. बैठकीत महाराष्ट्रातील फुलपाखरांना मराठीत नाव देण्यासह जैव विविधतेबाबतच्या महत्त्वाच्या विषयांवर चर्चा करण्यात आली.
जैव विविधता मंडळाच्या बैठकीच्या अध्यक्षस्थानी डॉ. विलास बर्डेकर होते. प्रमुख पाहुणे म्हणून वन विभागाचे प्रधान सचिव विकास खारगे, प्रधान मुख्य वन संरक्षक (वन्यजीव) नितीन काकोडकर, आदिवासी विकास विभागाचे वरिष्ठ संशोधन अधिकारी सोनकुसळे, संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ अमरावतीचे प्रयोगशाळा तंत्रज्ञ डॉ. जयंत वडतकर, आबासाहेब गरवारे महाविद्यालय पुणेचे जैव तंत्रज्ञान विभागप्रमुख डॉ. अंकुर पटवर्धन, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या राजीव गांधी जैव तंत्रज्ञान केंद्राच्या सहायक प्राध्यापिका डॉ. आरती शनवारे, शिवाजी विद्यापीठ कोल्हापूरचे सहायक प्राध्यापक डॉ. अधिकराव जाधव उपस्थित होते. बैठकीत जैव विविधता समित्या स्थापन करणे, लोक जैव विविधता नोंदवही तयार करणे, जैव विविधता व्यवस्थापन समित्यांना लाभांश वाटप करण्यासाठी टक्केवारी निश्चित करणे आदी महत्त्वाच्या विषयांवर चर्चा करण्यात आली. बैठकीत लोक जैवविविधता नोंदवही बेसलाईन डाटाचे विमोचन करण्यात आले. तालुका, जिल्हा व राज्य स्तरावर इतर विभागाचे व संस्थेच्या कार्यक्रमात सहभागी होण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले.