रेल्वे कर्मचाऱ्यांमुळेच नागपूर विभागाचा नावलौकिक : सोमेश कुमार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 17, 2019 11:34 PM2019-04-17T23:34:07+5:302019-04-17T23:34:44+5:30

रेल्वे कर्मचाऱ्यांमुळेच मध्य रेल्वेच्या नागपूर विभागाला महाव्यवस्थापकांतर्फे सात शिल्ड प्रदान करण्यात आले असून, कर्मचाऱ्यांनी योगदान दिल्यामुळे भारतीय रेल्वेच्या प्रगतीत विभाग आपली कामगिरी दाखवू शकला, असे प्रतिपादन मध्य रेल्वेच्या नागपूर विभागाचे ‘डीआरएम’ सोमेश कुमार यांनी केले.

Name of the Nagpur Division upgraded due to Railway employees: Somesh Kumar | रेल्वे कर्मचाऱ्यांमुळेच नागपूर विभागाचा नावलौकिक : सोमेश कुमार

रेल्वे कर्मचाऱ्यांमुळेच नागपूर विभागाचा नावलौकिक : सोमेश कुमार

Next
ठळक मुद्देनागपूर विभागात ६४ वा रेल्वे सप्ताह साजरा

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : रेल्वे कर्मचाऱ्यांमुळेच मध्य रेल्वेच्या नागपूर विभागाला महाव्यवस्थापकांतर्फे सात शिल्ड प्रदान करण्यात आले असून, कर्मचाऱ्यांनी योगदान दिल्यामुळे भारतीय रेल्वेच्या प्रगतीत विभाग आपली कामगिरी दाखवू शकला, असे प्रतिपादन मध्य रेल्वेच्या नागपूर विभागाचे ‘डीआरएम’ सोमेश कुमार यांनी केले.
मध्य रेल्वेच्या नागपूर विभागात ६४ व्या रेल्वे सप्ताहाचे आयोजन गुंजन सभागृहात करण्यात आले. प्रमुख पाहुणे म्हणून अप्पर विभागीय रेल्वे व्यवस्थापक मनोज तिवारी, एन. के. भंडारी उपस्थित होते.‘डीआरएम’ सोमेश कुमार म्हणाले,कर्मचाऱ्यांच्या मेहनतीमुळेच महाव्यवस्थापकाकंडून सात शिल्ड विभागाला मिळाले आहेत. विभागाने एप्रिल २०१८ ते मार्च २०१९ दरम्यान सर्वाधिक ३७.४५ मिलेनियम टन माल वाहतूक केली असून, यात ३२.५८ मिलेनियम टन कोळशाचा समावेश आहे. डिसेंबर महिन्यापर्यंत विभागाला ३७३०.३६ कोटी उत्पन्न मिळाले.विभागात १०० टक्के एलईडी लाईटचे ध्येय पूर्ण करण्यात आले आहे. प्रवाशांसाठी अतिरिक्त एफओबी, लिफ्ट, दिव्यांगांसाठी सुविधा प्रदान करण्यात आल्या. यावर्षी महाव्यवस्थापकांच्या हस्ते सात शिल्ड प्रदान करण्यात आल्या असून यात वाणिज्य शिल्ड, परिचालन शिल्ड, वर्क्स कार्यकुशलता शिल्ड, साफसफाईसाठी शिल्ड, अजनी रेल्वेस्थानक गार्डनच्या देखभालीसाठी शिल्ड, घोराडोंगरी रेल्वेस्थानकावर उत्कृष्ट गार्डनची देखभाल आणि स्टेशनच्या देखभालीबाबत शिल्ड आणि हिंदीत सर्वोत्कृष्ट कार्य केल्याबद्दल राजभाषा विभागाला शिल्ड मिळाली आहे. यावेळी वरिष्ठ विभागीय वाणिज्य व्यवस्थापक कृष्णाथ पाटील, वरिष्ठ विभागीय परिचालन व्यवस्थापक आशुतोष श्रीवास्तव, वरिष्ठ विभागीय अभियंता पवन पाटील, वरिष्ठ विभागीय यांत्रिक अभियंता अखिलेश चौबे, मुख्य आरोग्य अधीक्षक व्ही. के. आसुदानी, वरिष्ठ विभागीय अभियंता प्रशांत नल्लीक्वार, विभागीय अभियंता एम. के. सिरोलिया, राजभाषा अधिकारी पूर्णिमा सुरडकर यांना सन्मानित करण्यात आले. याशिवाय विभागाला तीन रोलिंग शिल्ड प्रदान करण्यात आल्या आहेत. यात बैतूल, धामणगाव, ढोढरामोहर स्थानकाचा समावेश आहे. विभागातील लेखा विभागाचे वरिष्ठ विभागीय लेखा अधिकारी चंद्रकांत कदम, अभियांत्रिकी विभागाचे सहायक विभागीय अभियंता रोहित मेहला, परिचालन विभागाचे विभागीय परिचालन व्यवस्थापक पंकज कुमार, आरोग्य विभागाच्या डॉ. शुभांगी साखरे, सिग्नल आणि दूरसंचार विभागाचे आलोक कुमार आणि १७ रेल्वे कर्मचाऱ्यांना महाव्यवस्थापकस्तरावर पुरस्कृत करण्यात आले. प्रास्ताविक विभागीय कार्मिक अधिकारी जी. पी. भगत यांनी केले. संचालन सुशील तिवारी यांनी केले. आभार सांझी जैन यांनी मानले.

Web Title: Name of the Nagpur Division upgraded due to Railway employees: Somesh Kumar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.