नाव परफेक्ट कॉलनी अन् सुविधाच नाहीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 17, 2021 04:07 AM2021-06-17T04:07:02+5:302021-06-17T04:07:02+5:30
- रस्त्यांवर पडले खड्डे, विविध समस्यांनी नागरिक त्रस्त लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : इंद्रप्रस्थनगर येथील परफेक्ट कॉलनी केवळ नावालाच ...
- रस्त्यांवर पडले खड्डे, विविध समस्यांनी नागरिक त्रस्त
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : इंद्रप्रस्थनगर येथील परफेक्ट कॉलनी केवळ नावालाच परफेक्ट आहे. वास्तवात या कॉलनीत एकही गोष्ट परफेक्ट नाही. कॉलनीतील नागरिक विविध समस्यांनी त्रस्त आहेत. अनेक वर्षांपासून लोकप्रतिनिधींच्या उदासीनतेमुळे येथे कुठल्याच सोई झालेल्या नाहीत. प्रशासनाचेही या परिसराकडे दुर्लक्ष आहे. येथील रस्त्यांवर अनेक वर्षापासून डांबरीकरणही झालेले नाही.
रस्ते बरोबर नसल्याने स्थिती अतिशय बिकट झालेली आहे. रस्त्यावर जागोजागी खड्डे पडलेले आहेत. गेल्या दहा वर्षापासून या रस्त्याचे डांबरीकरण झालेले नाही. गेल्या वर्षी नगरसेवकाने समस्यांचे निवारण करण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, ते कधीचेच हवेत विरले. स्थिती अजूनही जशीच्या तशी आहे. पावसाळ्यात तर समस्या आणखीनच उग्र रूप धारण करत असल्याचे परिसरातील नागरिक सांगत आहेत.
या परिसराच्या विकासासाठी लोकप्रतिनिधी व प्रशासनाकडून प्रयत्न केले जात नसल्याने नागरिक क्रोधित झाले आहेत. परिसरात मोकाट वराह व श्वानांचा राबता असतो. कधीही ते नागरिकांवर हल्ला करत असतात. याबाबत तक्रारी केल्यावरही कारवाई केली जात नाही. रस्त्याच्या बाजूला असलेल्या झुडपांची कापणी केली जात नसल्याने पावसाळ्यात डासांचे साम्राज्य असते. इंद्रप्रस्थनगरातील मुख्य मार्गाला लागून मनपाने सौंदर्यीकरण केले आहे. मात्र, दुसऱ्या बाजूला कचराघर तयार झाले आहे.
...................