छायाचित्र नसलेल्या नागपूर जिल्ह्यातील २.४७ लाख मतदारांची नावे होणार ‘डिलिट’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 2, 2021 08:34 PM2021-08-02T20:34:52+5:302021-08-02T20:35:16+5:30

Nagpur News मतदार यादीमध्ये छायाचित्र नसलेल्या तब्बल २ लाख ४६ हजार ९६० मतदारांची नावे मतदार यादीतून वगळण्यात येणार आहेत. यासंदर्भातील कारवाई सुरू झाली असून, आतापर्यंत ११,३४८ मतदारांची नावे वगळण्यात आलेली आहेत.

Names of 2.47 lakh voters in Nagpur district without photographs to be 'deleted' | छायाचित्र नसलेल्या नागपूर जिल्ह्यातील २.४७ लाख मतदारांची नावे होणार ‘डिलिट’

छायाचित्र नसलेल्या नागपूर जिल्ह्यातील २.४७ लाख मतदारांची नावे होणार ‘डिलिट’

googlenewsNext
ठळक मुद्देआतापर्यंत ११,३४८ नावे वगळली

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : मतदार यादीमध्ये छायाचित्र नसलेल्या तब्बल २ लाख ४६ हजार ९६० मतदारांची नावे मतदार यादीतून वगळण्यात येणार आहेत. यासंदर्भातील कारवाई सुरू झाली असून, आतापर्यंत ११,३४८ मतदारांची नावे वगळण्यात आलेली आहेत. उर्वरितांची नावे वगळण्याची कारवाई सुरू आहे.

नागपूर जिल्ह्यात एकूण ४२ लाख ३० हजार ३८८ आहेत. त्यापैकी छायाचित्र नसलेल्या मतदारांची संख्या २ लाख ४६ हजार ९६० इतकी आहे. मतदार यादीतील प्रत्येक मतदाराची फोटो आयडी आवश्यक आहे. ती सातत्याने अपडेट केली जाते. दरवर्षीचा हा कार्यक्रम असतो. परंतु निवडणूक आयोगाकडून प्रत्येक मतदाराचा फोटो हा बंधनकारक केला असून, ज्यांचे फोटो मिळणार नाहीत, त्यांची नावे मतदार यादीतून वगळण्याचे निर्देश दिले आहेत. त्यानुसार मतदार यादीच ज्यांचा फोटो नाही अशांसाठी विशेष मोहीम राबविण्यात आली.

निवडणूक विभागाचे कर्मचारी हे घरोघरी फिरले, त्यांनी फोटो मिळविले. गेल्या २३ जुलै रोजी या विशेष मोहिमेचा कालावधी संपला. तेव्हा नागपूर जिल्ह्यातील तब्बल २ लाख ४६ हजार ९६० मतदारांचे फोटो मिळू शकले नाही. हे मतदार त्यांच्या पत्त्यावर आढळून न आल्याने त्यांचे फोटो मिळू शकले नाही. म्हणजेच हे मतदार आपला मतदारसंघ सोडून गेल्याचे स्पष्ट होते. परिणामी या सर्वांची नावे मतदार यादीतून वगळण्याची प्रक्रिया सुरू आहे. आतापर्यंत काटोलमधील ११९५, सावनेर २८८, हिंगणा ५०२, उमरेड ८७९, कामठी १७०९, रामटेक २७०३, नागपूर दक्षिण-पश्चिम -५६२, नागपूर दक्षिण १६०८, नागपूर पूर्व ३७, नागपूर मध्य १३५, नागपूर पश्चिम ६९६ आणि उत्तर नागपूर मतदारसंघातील १०३४ असे एकूण ११,३४८ मतदारांची नावे आतापर्यंत वगळण्यात आली आहे. उर्वरित मतदारांची नावे वगळण्याची प्रक्रिया सुरू आहे.

- १२०५८ जणांचे मिळाले फोटो

निवडणूक विभागातर्फे राबविण्यात आलेल्या विशेष मोहिमेंतर्गत केवळ २३ जुलैपर्यंत १२,०५८ मतदारांचे फोटो मिळाले. काही जणांचे फोटो त्यांच्या घरी गेल्यावर मिळाले तर काहींना कार्यालयात येऊन, ऑनलाइन जमा केले.

 

 

 

Web Title: Names of 2.47 lakh voters in Nagpur district without photographs to be 'deleted'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Votingमतदान