नागपूरच्या नम्रता, धनश्रीला सुवर्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 12, 2017 12:46 AM2017-09-12T00:46:55+5:302017-09-12T00:47:06+5:30

यजमान नागपूर संघातील नम्रता हटवार हिने ३२ किलो वजनगटात तसेच धनश्री कांबळेने ५६ किलो वजनगटात दोन दिवसांच्या राज्य वुशू स्पर्धेत सुवर्णपदके जिंकली.

Namrata of Nagpur, Dhanashri Gold | नागपूरच्या नम्रता, धनश्रीला सुवर्ण

नागपूरच्या नम्रता, धनश्रीला सुवर्ण

Next
ठळक मुद्देराज्य वुशू स्पर्धा: मुंबईचे वर्चस्व कायम

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : यजमान नागपूर संघातील नम्रता हटवार हिने ३२ किलो वजनगटात तसेच धनश्री कांबळेने ५६ किलो वजनगटात दोन दिवसांच्या राज्य वुशू स्पर्धेत सुवर्णपदके जिंकली.
नागपूर वुशू असोसिएशन आणि महानगरपालिकेच्या संयुक्त विद्यमाने विवेकानंदनगर येथील मनपा इन्डोअर स्पोर्ट्स कॉम्प्लेक्समध्ये सोमवारी संपलेल्या या स्पर्धेवर मुंबई शहर संघाने वर्चस्व गाजविले.
१४ वर्षांखालील मुलींच्या सान्सू (फाईट) प्रकारात शेफाली खैरे, संचिता काळे, तनिषा करकेरा आणि मानसी सिंग यांनी सुवर्ण जिंकले. साक्षी महाजन, सेजल खैरे, प्राची यादव यांनी रौप्य तसेच पीयूषा लोणी, किबा बागुल, वैष्णवी नाईक, सानिया तांबोळी, आर्या गवळी व धनश्री पाहुरकरने कांस्य जिंकले.
सान्सू प्रकार (सबज्युनियर मुली) : १५ किलो वजनगट : अनुष्का जैन (औरंगाबाद), स्वरा वाडेकर (सांगली), पीयूषा लोणी, वैष्णवी नाईक (मुंबई शहर). २० किलो : रेणुका राऊत (यवतमाळ), साक्षी काळे (परभणी), तेजस्वी बोंदे्र (नागपूर), तनिष्का तामस्कर (गडचिरोली). २४ किलो : नंदिनी स्वानी (कोल्हापूर), कुमुदिनी बिसेन (नागपूर), आखा शेख (मुंबई उपनगर), सानिया तांबोळी (मुंबई शहर). २८ किलो : दिशा कुरुवाडे (कोल्हापूर), साक्षी महाजन (मुंबई शहर), अंकिता गाडगे (अकोला), अंकिता पवार (परभणी). ३२ किलो : नम्रता हटवार (नागपूर), गीता मोरे (धुळे), पायल पवार (सोलापूर), आर्या गवळी (मुंबई शहर). ३६ किलो : शेफाली खैरे (मुंबई शहर), सेजल खैले (मुंबई शहर), आरती खवंदळे (परभणी), तृप्ती टेकाम (नागपूर). ४० किलो : १) संचिता काळे (मुंबई शहर), पूजा जाधव (मुंबई उपनगर), रिया गोंडाळे (यवतमाळ), वसुंधरा कांबळे (पुणे). ४४ किलो : तनिशा करकेश (मुंबई शहर), प्राची यादव (मुंबई शहर), पल्लवी क्षीरसागर (वर्धा), तनू मस्के (नागपूर). ४८ किलो : पूजा शाह (पालघर), पल्लवी वाघ (धुळे), जुही निनगे (सांगली), नंदिनी इटनकर (नागपूर). ५२ किलो : वर्षा भंडारे (कोल्हापूर), अंजली अटमनी (सोलापूर), कृपा शेटे (सोलापूर), धनश्री पाहुरकर (मुंबई शहर). ५६ किलो : धनश्री कांबळे (नागपूर), प्रिया भरांडे (परभणी), किबा बागुल (मुंबई शहर). ६० किलो : मानसी सिंग (मुंबई शहर).

Web Title: Namrata of Nagpur, Dhanashri Gold

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.