नाना पटोलेंची सिमेंट रस्त्यावर टीका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 15, 2017 01:16 AM2017-09-15T01:16:36+5:302017-09-15T01:16:48+5:30

पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह सहकार मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्यावर टीकास्त्र सोडणारे ....

Nana Patalengi cement road criticism | नाना पटोलेंची सिमेंट रस्त्यावर टीका

नाना पटोलेंची सिमेंट रस्त्यावर टीका

Next
ठळक मुद्देनिकृष्ट दर्जाकडे आयुक्तांचे वेधले लक्ष : सत्तापक्षाशी चर्चा न करता थेट तक्रार

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह सहकार मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्यावर टीकास्त्र सोडणारे भाजपचे भंडारा येथील खासदार नाना पटोले यांनी गुरुवारी नागपूर शहरातील सिमेंट रस्त्यांच्या निकृष्ट कामावर टीका केली आहे. भाजपाची सत्ता असलेल्या नागपूर महापालिकेच्या कामकाजावर टीका केल्याने राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चा आहे.
नाना पटोले त्यांच्या नातेसंबंधातील एका व्यक्तीच्या संपत्तीवर अवैध कब्जा करणाºयांच्या विरोधात तक्रार करण्यासाठी ते महापालिकेत आले होते. त्यांनी आयुक्त अश्विन मुदगल यांच्याशी चर्चा केली. यावेळी त्यांनी दीक्षाभूमीसमोरील त्यांच्या घरासमोरील सिमेंट रस्त्याला वर्षभरातच तडे गेल्याचे नमूद करीत या कामात अनियमितता झाल्याकडे आयुक्तांचे लक्ष वेधले.
३० सप्टेंबरला धम्मचक्र प्रवर्तन दिन असून या परिसरात लाखो भाविक येणार आहे. मात्र, अद्यापही सिमेंट रस्त्यांची कामे अपूर्ण आहेत. त्यामुळे नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. लवकरात लवकर सिमेंट रस्त्यांची कामे पूर्ण करण्याच्या लालसेपोटी कंत्राटदार रस्त्यांची गुणवत्ताच ठेवणार नाही. त्यामुळे दीक्षाभूमी परिसरातील सिमेंट रस्त्यांची कामे येथील कार्यक्रमानंतर करावी, अशी सूचना त्यांनी आयुक्तांना केली. यावेळी दीक्षाभूमीबाबत विविध समस्यांचे निवेदन घेऊन आलेले रिपाइं एचे शहर अध्यक्ष बाळू घरडेही आयुक्तांना भेटण्यास आले होते. पटोले यांनी शिष्टमंडळाच्या मागण्यांचे समर्थन करीत दीक्षाभूमी परिसरात स्टॉल लावण्यासाठी जागा देण्याचीही मागणी केली.

Web Title: Nana Patalengi cement road criticism

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.