नांद नदीला पूर, वाहतूक ठप्प
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 9, 2021 04:07 AM2021-07-09T04:07:34+5:302021-07-09T04:07:34+5:30
लाेकमत न्यूज नेटवर्क नांद : नांद (ता. भिवापूर) परिसरात काेसळलेल्या मुसळधार पावसामुळे नांद नदीला पूर आला हाेता. त्यामुळे वाहतूक ...
लाेकमत न्यूज नेटवर्क
नांद : नांद (ता. भिवापूर) परिसरात काेसळलेल्या मुसळधार पावसामुळे नांद नदीला पूर आला हाेता. त्यामुळे वाहतूक ठप्प झाली हाेती. त्यातच काेमेजलेल्या पिकांना या पावसामुळे जीवनदान मिळाल्याचे समाधान शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर दिसून येत हाेते.
नांद परिसरात गुरुवारी (दि. ८) सकाळी ११ वाजतापासून मुसळधार पावसाला सुरुवात झाली. अंदाजे दाेन ते अडीच तास पावसाचा जाेर कायम हाेता. या पावसामुळे साेयाबीन, कपाशी, तूर व इतर पिकांना जीवनदान मिळाले आहे. कारण, मागील दाेन आठवड्यापासून पावसाने दडी मारल्याने काेमेजलेली ही पिके कशीतरी तग धरून हाेती. त्यातच काही शेतकऱ्यांनी धानाच्या राेवणीची तयार सुरू केली.
या पावसामुळे चालू खरीप हंगामात पहिल्यांदाच नांद नदीला पूर आला हाेता. त्यामुळे येथील वाहतूक काही काळ ठप्प झाली हाेती. पुरामुळे कुठेही फारसे नुकसान झाल्याचे आढळून आले नाही. मात्र, काेमेजलेली पिके टवटवीत झाल्याने शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर त्याचे समाधान स्पष्टपणे दिसून येत हाेते.
...
कमी उंचीचा पूल त्रासदायक
नांद-धामणगाव मार्गवरील नांद नदीवर असलेल्या पुलाचे बांधकाम १६ वर्षापूर्वी करण्यात आले हाेते. हा मार्ग १५ गावांसह पुढे ताडाेबा अभयारण्याच्या दिशेने जाताे. शेतकरी व मजूर या पुलाचा वापर शेतात जाणे, वहिवाट करणे व शेतमालाच्या वाहतुकीसाठी करतात. या पुलाची उंची कमी असल्याने पुलावरून पाणी वाहते आणि वाहतूक ठप्प हाेते. त्यामुळे शेतात गेलेल्या शेतकरी व मजुरांना पूर ओसरेपर्यंत पलीकडे थांबावे लागत असल्याने त्रासदायक ठरत आहे. त्यामुळे येथे उंच पुलाचे बांधकाम करण्याची मागणी शेतकऱ्यांसह नागरिकांनी केली आहे.
080721\img_20210708_164549.jpg
नदी पूर