संचारबंदीमुळे नंदुरबार जिल्हा ‘सायलंट’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 25, 2020 01:14 PM2020-03-25T13:14:19+5:302020-03-25T13:14:27+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : संचारबंदीनंतरही शहरात भटकणाऱ्या उत्साहींमुळे गांभिर्य हरवत असल्याने पोलीसांनी रस्त्यावर उतरुन अटकाव केला़ लागू झालेल्या ...
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : संचारबंदीनंतरही शहरात भटकणाऱ्या उत्साहींमुळे गांभिर्य हरवत असल्याने पोलीसांनी रस्त्यावर उतरुन अटकाव केला़ लागू झालेल्या संचारबंदीच्या आदेशामुळे नंदुरबारसह शहादा, तळोदा, अक्कलकुवा, तळोदा, धडगाव आणि नवापुर ही शहरे ओस पडली असून दुपारी १२ वाजेनंतर सर्वत्र भयाण शांतता परसली असल्याचे दिसून येत आहे़
कोरोनाला थोपवण्यासाठी राज्य शासनाने महाराष्ट्र लॉकडाऊन करण्याचा आदेश काढून राज्यात संचारबंदी लागू करण्याचा निर्णय घेतला आहे़ जीवनावश्यक सेवा आणि शासकीय कार्यालयांना वगळून हा निर्णय घेण्यात आला आहे़ या पार्श्वभूमीवर नंदुरबार शहर आणि उपनगर या दोन पोलीस ठाणे हद्दीत पोलीस बंदोबस्त तैनात करुन नागरिकांची तपासणी करुन गरजेचे असेल तरच त्यांना शहरात प्रवेश देण्यात येत होता़ अन्यथा घरी जाण्याच्या सूचना पोलीसांकडून देण्यात येत होत्या़ शहरातील गिरीविहार, हाट दरवाजा, नेहरु चौक, अंधारे चौक, मोठा मारुती, धुळे चौफुली, महाराष्ट्र व्यायाम शाळा, साक्री नाका यासह विविध भागात पोलीसांकडून बॅरिकेटींग करुन येणाºया जाणाऱ्यांची चौकशी करण्यात येत होती़ यावेळी कारण नसताना शहरात मस्ती म्हणून हिंडणाºया काहींना पोलीसांनी ‘लाठीमार’ दिल्यानंतर त्यांनी घरी धूम ठोकली होती़ पोलीसांच्या हाती आलेल्या काहींना पोलीस अधिकाºयांसमोर ऊठबशा घालून शिक्षाही भोगावी लागली होती़ यानंतर मात्र बºयाच अंशी नियंत्रण येऊन उत्साहींच्या कारवाया थांबल्या होत्या़ दिवसभर पोलीस पथकाकडून शहरात ये-जा करणाºयांची चौकशी सुरु होती़ दरम्यान शहरातील विविध भागात सकाळी पोलीस अधिक्षक महेंद्र पंडीत, अप्पर पोलीस अधिक्षक चंद्रकांत गवळी, उपविभागीय पोलीस अधिकारी रमेश पवार यांच्यासह पोलीस अधिकाºयांनी भेट देत आढावा घेतला़ यावेळी पोलीस अधिक्षक महेंद्र पंडीत व अप्पर पोलीस अधिक्षक चंद्रकांत गवळी यांनी नागरिकांनी घरातच थांबून स्वत:ची काळजी घेण्याचे आवाहन केले़
संचारबंदी काळात शहरातील विविध भागात जीवनाश्यक वस्तूंची विक्री सुरु ठेवण्यात आली होती़ तसेच वैद्यकीय कारणांसाठी जाणाºयांना सूट देण्यात येत असल्याचे चित्र यावेळी दिसून आली़ शहरातील नागरिकांची गैरसोय होवू नये यासाठी सर्व किराणा दुकाने मंगळवारी नियमितपणे सुरु ठेवण्यात आली होती़
सोमवारी सहायक जिल्हाधिकारी तथा प्रांताधिकारी वसुमना पंत यांनी शहरातील दुकानांमध्ये चौकशी करुन जिवनाश्यक वस्तूंची रास्त दरात विक्री करण्याचे आदेश दिले होते़ त्यानुसार कामकाज होत असल्याचे सांगण्यात आले होते़ दुसरीकडे नागरिकांना दैनंदिन लागणारा भाजीपाला तसेच फळांची दुकानेही सुरळीतपणे सुरु होती़ बाजार समितीचा भाजीपाला मार्केट बंद असल्याने आडतदार व शेतकरी हे बाहेरच खरेदी-विक्रीचे व्यवहार करुन शहराला भाजीपाला पुरवठा करत आहेत़ कांदा तसेच हिरव्या भाज्यांची आवक झाल्याने नागरिकांना दिलासा मिळाला होता़ बुधवारी गुढीपाडवा असल्याने मंगळवारी बाजारात खरेदीसाठी गर्दी झाली होती़ पोलीसांनी समज दिल्यानंतर मात्र नागरिकांनी गर्दी करत आवश्यक वस्तू खरेदी केल्या़
पोलीस प्रशासनाकडून शहरी भागासोबत जिल्ह्यातील चार पोलीस ठाण्यांतर्गत आंतरजिल्हा नाकाबंदी पॉर्इंट तर ९ पोलीस ठाण्यांतर्गत आंतर राज्य नाकाबंदी पॉर्इंटची निर्मिती करण्यात आली आहे़ याठिकाणी वाहनांची तपासणी करुन महामार्गावर प्रवेश दिला जात होता़ आरोग्य, प्रादेशिक परिवहन विभाग आणि पोलीसांचे पथक याठिकाणी तैनात करण्यात आले आहे़
४पोलीस प्रशासनाने विसरवाडी पोलीस ठाण्यांतर्गत कोंडाईबारी घाट, नवापुर पोलीस ठाण्यांतर्गत पिंपळनेर चौफुली, नंदुरबार तालुका पोलीस ठाणे हद्दीत ठाणेपाडा आणि न्याहली, सारंगखेडा पोलीस ठाण्यांतर्गत हिंगणी फाटा आणि टाकरखेडा येथे आंतर जिल्हा नाकाबंदी पॉर्इंटची निर्मिती केली आहे़ या ठिकाणी प्रत्येकी दोन पोलीस पथक, आरोग्य पथक तैनात असून त्यांच्याकडून वाहनांची तपासणी करण्यात येत आहे़
४गुजरात राज्याला लागून असलेल्या नंदुरबार जिल्ह्यात बाहेरील राज्यातून येणाºया वाहनांवरही प्रशासनाची कडेकोट नजर आहे़ यात विसरवाडी पोलीस ठाण्यांतर्गत करोड मरोड गावाजवळ चार पोलीस पथक, अक्कलकुवा पोलीस ठाणे हद्दीत गव्हाळी चेकनाक्यावर ५, नवापुर आरटीओ चेकपोस्टवर ६, शहादा पोलीस ठाण्यांतर्गत प्रकाशा दूरक्षेत्रातील देवापाट नाला येथे ३, मोलगी पोलीस ठाण्यांतर्गत वडफळी येथे ५, तळोदा पोलीस ठाणे हद्दीत कुकरमुंडा फाटा व डोडवा नाक्यावर ४ पोलीस पथकांची नियुक्ती करण्यात
४मध्यप्रदेश राज्याला लागून असलेल्या शहाणा येथे शहादा पोलीस ठाण्याकडून २ तर खेडदिगर येथे म्हसावद पोलीस ठाण्याने ३ पथकांची नियुक्ती करत बंदोबस्त लावला आहे़ एका पथकात सहा पेक्षा अधिक कर्मचाºयांची नियुक्ती करण्यात आली आहे़ हे अधिकारी कर्मचारी सुरक्षित अंतर ठेवून येणाºया वाहनांची तपासणी करण्यासाठी आरोग्य विभागाला सहाय्य करत आहेत़