रात्रभर वीज खंडित, पाणीपुरवठा विस्कळीत; संतप्त नागरिकांकडून महावितरण कार्यालयात तोडफोड 

By आनंद डेकाटे | Published: April 21, 2023 01:52 PM2023-04-21T13:52:32+5:302023-04-21T13:56:35+5:30

वादळी पावसाने हाहाकार

Narendra Nagar Mahavitaran office vandalised by angry citizen as power outage overnight after havoc with stormy rain | रात्रभर वीज खंडित, पाणीपुरवठा विस्कळीत; संतप्त नागरिकांकडून महावितरण कार्यालयात तोडफोड 

रात्रभर वीज खंडित, पाणीपुरवठा विस्कळीत; संतप्त नागरिकांकडून महावितरण कार्यालयात तोडफोड 

googlenewsNext

नागपूर :  गुरुवारी रात्री वादळी वाऱ्यासह पडलेल्या पावसामुळे शहरातील अनेक भागातील वीजपुरवठा खंडित झाला. रात्रभर वीज नसल्याने महावितरणच्या नरेंद्र नगर कार्यालयात नागरिकांनी तोडफोड केली. तर इतरही भागात नागरिक संतप्त होते. विजेअभावी अनेक ठिकाणचा पाणीपुरवठाही विस्कळीत झाला. 

नागपुरातील रात्रभर वीज नसलेल्या भागात नरेंद्र नगर जवळील श्री नगर, एम्प्रेस मिल सोसायटी, कन्हैया रेसिडेन्सी, व्यंकटेश सिटी, बेसा, मनीष नगर, गांधीबाग, सावरकर नगर, वर्धा रोड, विवेकानंदनगरचा काही भाग, संताजी काॅलनी रामकृष्णनगर, लक्ष्मीनागर आणि इतरही अनेकच भागाचा समावेश होता. दरम्यान, महावितरण कर्मचारी फोन उचलत नसल्याने नरेंद्रनगर भागातील वीज कार्यालयात संतप्त नागरिकांनी तोडफोड केली. अजनी कार्यालयातही नागरिक संतप्त झाले होते, पण पोलीस बंदोबस्त वाढवल्याने अनुचित घटना टाळली.

वीज कर्मचाऱ्यांना सूचना होताच त्यांनी रात्री अंधारातही झटपट दुरुस्तीचे काम हाती घेतले. त्यांना कामात वीज यंत्रणेवर वृक्ष पडले असण्यासह इतरही बऱ्याच तांत्रिक अडचणी येत होत्या. दुसरीकडे महावितरणचे सर्व वरिष्ठ अधिकारीही रात्रभर विविध भागात गस्त घेत कामाचा आढावा घेत, कर्मचाऱ्यांना प्रोत्साहित करत होते. त्यामुळे शहरातील बहुतांश भागात रात्री पुरवठा सुरळीत झाल्याचा दावा महावितरणकडून केला गेला. तर बऱ्याच भागात रात्रीपासून सकाळपर्यंत वीज नसल्याने पाण्याची मशीन नागरिकांना सुरू करता आली नाही. त्यामुने पाणी नसल्याने नागरिकांची दमछाक झाली.

- हिवरीनगर भागात दोन दिवसांपासून वीज नाही 

हिवरीनगर भागात बुधवारपासून वीज नाही. बुधवारी सकाळी ८ ते दुपारी ४ वाजेपर्यंत वीज पुरवठा खंडीत होता. यातच गुरुवारी आलेल्या वादळी पावसामुळे पुन्हा येथील नागरिकांना फटका बसला. सायंकाळपासून वीज गेली ती रात्री उशीरापर्यंत आलीच नाही. यासंदर्भात महावितरणच्या कार्यालयाला वारंवार विचारणा केली तरी कुणी काही सांगत नसल्याने नागरिक संतप्त झाले असल्याचे येथील माजी नगरसेवक यशवंत मेश्राम यांनी सांगितले.

Web Title: Narendra Nagar Mahavitaran office vandalised by angry citizen as power outage overnight after havoc with stormy rain

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.