“तीन कृषी कायदे पुन्हा येऊ शकतात”; कृषीमंत्री नरेंद्रसिंह तोमर यांचे संकेत

By ऑनलाइन लोकमत | Published: December 25, 2021 06:28 AM2021-12-25T06:28:08+5:302021-12-25T06:29:06+5:30

शेतकरी व शेतीक्षेत्राच्या विकासासाठी स्वातंत्र्यानंतर नरेंद्र मोदी सरकारने कृषी कायदे आणले होते.

narendra singh tomar hints Three farm laws may come again | “तीन कृषी कायदे पुन्हा येऊ शकतात”; कृषीमंत्री नरेंद्रसिंह तोमर यांचे संकेत

“तीन कृषी कायदे पुन्हा येऊ शकतात”; कृषीमंत्री नरेंद्रसिंह तोमर यांचे संकेत

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : शेतकरी व शेतीक्षेत्राच्या विकासासाठी स्वातंत्र्यानंतर नरेंद्र मोदी सरकारने कृषी कायदे आणले होते. केंद्र सरकारला नाइलाजाने ते मागे घ्यावे लागले; परंतु ‘सरकार निराश नाही. आम्ही एक पाऊल मागे हटलो आहोत. पुन्हा दोन पावले पुढे जाऊ,’ असे सांगून ते तिन्ही कृषी कायदे भविष्यात परत येऊ शकतात, असे संकेत केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्रसिंह तोमर यांनी शुक्रवारी दिले.

ॲग्रो व्हिजन कृषी प्रदर्शनाच्या उद्घाटन कार्यक्रमात ते बोलत होते. स्वातंत्र्यानंतर कृषिक्षेत्रात खूप काम झाले; परंतु खासगी गुंतवणूक झाली नाही. इतर क्षेत्रात खासगी गुंतवणूक आली. त्याचे फायदेही मिळाले; परंतु खासगी गुंतवणूक न झाल्याने फायदा कृषिक्षेत्राला झाला नाही असे म्हणाले.
 

Web Title: narendra singh tomar hints Three farm laws may come again

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.