National Sports Day : नरखेडच्या भूमिपुत्राचा जर्मनीमध्ये वाजला डंका!

By ऑनलाइन लोकमत | Published: August 29, 2023 11:53 AM2023-08-29T11:53:37+5:302023-08-29T11:55:28+5:30

ड्युसबर्ग ट्रायल्थॉनमध्ये पहिल्याच प्रयत्नात पटकावला आयर्नमॅन ७०.३ चा खिताब

Narkhed's Nitin Fuke Wins Ironman 70.3 title in first attempt at Duisburg Triathlon in Germany | National Sports Day : नरखेडच्या भूमिपुत्राचा जर्मनीमध्ये वाजला डंका!

National Sports Day : नरखेडच्या भूमिपुत्राचा जर्मनीमध्ये वाजला डंका!

googlenewsNext

नागपूर : नरखेड तालुक्यातील जुनाेना फुके या गावातील शेतकरी कुटुंबातील नितीन फुके या ४२ वर्षीय तरुणाने जर्मनी येथील ड्युसबर्ग येथे पार पडलेल्या ट्रायल्थॉन स्पर्धेत जागतिक पातळीवरील आयर्नमॅन ७०.३ हा खिताब पहिल्याच प्रयत्नात पटकावला आहे.

उच्च कोटीचे जलतरणपटू (स्विमर) असलेले नितीन यांनी सलग सहा वर्षे ट्रायल्थॉनसाठी तयारी केली होती. त्यानंतर ड्युसबर्ग येथे पार पडलेल्या स्पर्धेत त्यांनी पहिल्यांदाच सहभाग घेतला. ट्रायल्थॉनमध्ये १.९ किमी स्विमिंग, ९० किमी सायकलिंग आणि २१ किमी रनिंग हे तीन इव्हेंट सलग सात तासांत त्यांनी पूर्ण केले आणि आयर्नमॅन ७०.३ चा खिताब आपल्या नावे केला.

विशेष म्हणजे, सर्व स्पर्धकांना हे तीनही इव्हेंट साडेआठ तासाच्या आत पूर्ण करायचे होते. नितीन यांनी दीड तास आधीच फिनिश लाइन पार केली. या स्पर्धेत जगभरातील १९४४ स्पर्धक सहभागी झाले होते. त्यात नऊ भारतीयांचा समावेश होता. त्यात नितीन यांच्यासह नागपूर जिल्ह्यातून वैभव अंधारे, पार्थ मानापुरे, अमित थत्ते, रचना अग्रवाल, भूषण वासवानी व डॉ. अभिनव यांचा समावेश होता. स्पर्धा आटोपून मायदेशी परतल्यानंतर नागपूरकरांनी विमानतळावर त्यांचे जल्लोषात स्वागत केले.

करणार काश्मीर ते कन्याकुमारी सायकलवारी!

- नितीन यांनी आतापर्यंत २००, ३००, ४०० व ६०० किमी अंतराच्या तसेच ब्रेव्हे या सायकल शर्यती पूर्ण केल्या आहेत. शिवाय, मुंबई मॅरेथॉनमध्ये त्यांनी सहभाग घेतला होता. आता काश्मीर ते कन्याकुमारी असा ३६०० किमीची सायकल रेस पूर्ण करण्याचा निर्धार त्यांनी केला आहे. नितीन यांची पत्नी पल्लवी यासुद्धा उत्तम धावपटू आहेत. नितीन यांनी आपल्या यशाचे श्रेय आंतरराष्ट्रीय सायकलपटू डॉ. अमित समर्थ यांना दिले आहे. या खेळाची प्रेरणा आ. डॉ. परिणय फुके यांच्याकडून मिळाल्याचे नितीन सांगतात.

Web Title: Narkhed's Nitin Fuke Wins Ironman 70.3 title in first attempt at Duisburg Triathlon in Germany

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.