‘नासुप्र’ची ऑनलाईन अर्ज, ड्रॉप बॉक्स सेवा ठरली यशस्वी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 8, 2021 04:07 AM2021-05-08T04:07:51+5:302021-05-08T04:07:51+5:30

नागरिकांचा उत्तम प्रतिसाद लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : कोरोना प्रादुर्भावाच्या नागपूर सुधार प्रन्यास (नासुप्र) व नागपूर महानगर प्रदेश ...

Nasupra's online application, Drop Box service was a success | ‘नासुप्र’ची ऑनलाईन अर्ज, ड्रॉप बॉक्स सेवा ठरली यशस्वी

‘नासुप्र’ची ऑनलाईन अर्ज, ड्रॉप बॉक्स सेवा ठरली यशस्वी

Next

नागरिकांचा उत्तम प्रतिसाद

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : कोरोना प्रादुर्भावाच्या नागपूर सुधार प्रन्यास (नासुप्र) व नागपूर महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (नामप्रविप्रा) या दोन्ही कार्यालयात नागरिकांना प्रवेश प्रतिबंध करण्यात आले असून, कमीत कमी अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत ही दोन्ही कार्यालये सुरू आहेत. मात्र, नागरिकांना कोणतीही अडचण होऊ नये व कार्यालयाशी संबंधित त्यांची कामे पूर्ण करता यावीत यासाठी ऑनलाईन अर्ज करण्याचे व कार्यालयात लावण्यात आलेल्या ड्रॉप बॉक्स सुविधेचा लाभ घेण्याचे आवाहन 'नासुप्र'चे सभापती तथा 'नामप्रविप्रा'चे महानगर आयुक्त मनोजकुमार सूर्यवंशी यांनी नागरिकांना केल्यानंतर या संकल्पनेला नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे.

बहुतांश नागरिक ऑनलाईन अर्ज करत आहेत, तर पहिल्यांदाच ड्रॉप बॉक्स सुविधा उपलब्ध करून दिल्याने केवळ एका महिन्यातच १७५ अर्ज ड्रॉप बॉक्सच्या माध्यमातून दोन्ही कार्यालयात प्राप्त झाले आहेत. नागरिकांच्या अर्जावर तातडीने कारवाई करत आतापर्यंत ड्रॉप बॉक्समधील १४५ अर्ज निकालीही काढण्यात आले. उर्वरित अर्जही लवकरच निकाली काढण्यात येणार आहेत.

राज्य शासनातर्फे १५ मेपर्यंत कडक निर्बंध वाढवण्यात आल्याने तेव्हापर्यंत नागरिकांना नासुप्र व नामप्रविप्रा कार्यालयात येता येणार नाही. त्यामुळे नागरिकांनी पुढेही ऑनलाईन आणि ड्रॉप बॉक्स सुविधेचा वापर करत राहण्याचे आवाहन पुन्हा एकदा मनोजकुमार सूर्यवंशी यांनी नागरिकांना केले आहे.

Web Title: Nasupra's online application, Drop Box service was a success

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.