मोदी सरकारच्या पराभवासाठी राष्ट्रीय व क्षेत्रीय पक्षांनी एकत्र यावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 14, 2023 08:08 PM2023-01-14T20:08:42+5:302023-01-14T20:09:22+5:30

Nagpur News देशभरात सुरू असलेली ही मनमानी रोखण्यासाठी, मोदी सरकारच्या पराभवासाठी राष्ट्रीय व क्षेत्रीय पक्षांनी एकत्र येण्याचे आवाहन भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे राष्ट्रीय सचिव डॉ. भालचंद्र कांगो यांनी केले.

National and regional parties should unite to defeat the Modi government | मोदी सरकारच्या पराभवासाठी राष्ट्रीय व क्षेत्रीय पक्षांनी एकत्र यावे

मोदी सरकारच्या पराभवासाठी राष्ट्रीय व क्षेत्रीय पक्षांनी एकत्र यावे

Next

नागपूर : आरएसएसचा अजेंडा मोदी सरकार पुढे रेटत आहे. देशातील ९५ टक्के जनतेला आर्थिक रूपाने जर्जर करुण, देशातील जल-ज॑गल- जमिनीचे व सार्वजनिक क्षेत्राचे अधिकार काही खास कार्पोरेटच्या हाती सरकारने सोपविले आहे. नोटाबंदी, जीएसटी, सार्वजनिक क्षेत्राची अतिशय कमी भावात भांडवलदारांना विक्री, कामगार कायद्याची भांडवलदारांच्या हितासाठी तोडमोड करणे, आरक्षण, शिष्यवृत्ती, रेशन व्यवस्था बंद करण्याचे पाऊल मोदी सरकार उचलत आहे. देशभरात सुरू असलेली ही मनमानी रोखण्यासाठी, मोदी सरकारच्या पराभवासाठी राष्ट्रीय व क्षेत्रीय पक्षांनी एकत्र येण्याचे आवाहन भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे राष्ट्रीय सचिव डॉ. भालचंद्र कांगो यांनी केले.

भाकपचे राष्ट्रीय महाअधिवेशन विजयवाडा येथे होणार आहे. त्याच्या तयारीसाठी भाकपच्या नागपूर जिल्ह्याच्या कार्यकारिणीची बैठक त्यांनी घेतली. या बैठकीला अध्यक्ष म्हणून राज्याचे सचिव श्याम काळे, भाकपचे राष्ट्रीय काऊन्सिल सदस्य शिवकुमार गणवीर, जिल्हा सहसचिव करुणा साखरे, प्रेम जोगी आदी उपस्थित होते. स॑चालन अरुण वनकर तर आभार संजय राऊत यांनी मानले.

Web Title: National and regional parties should unite to defeat the Modi government

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.