संजीव पेंढारकर यांना राष्ट्रीय पुरस्कार
By Admin | Published: March 25, 2017 02:54 AM2017-03-25T02:54:30+5:302017-03-25T02:54:30+5:30
द नॅशनल चेंबर आॅफ कॉमर्स आणि इंडस्ट्री आॅफ इंडिया पुरस्कृत ‘नॅशनल ग्लोरी आॅफ इंडिया’ या पुरस्काराने
‘नॅशनल ग्लोरी आॅफ इंडिया’ : विकोच्या उत्पादनांना विदेशात मागणी
नागपूर : द नॅशनल चेंबर आॅफ कॉमर्स आणि इंडस्ट्री आॅफ इंडिया पुरस्कृत ‘नॅशनल ग्लोरी आॅफ इंडिया’ या पुरस्काराने विको लेबॉरेटरीजचे संचालक संजीव पेंढरकर यांना २१ मार्चला मुंबईत एका समारंभात सन्मानित करण्यात आले. भारतात आपल्या व्यवसायात विकासाची भरारी घेणाऱ्या आणि त्याकरिता आपले योगदान देणाऱ्या यशस्वी व अभिनव अशा व्यावसायिक आणि पुरवठादारांना त्यांच्या नाविन्यपूर्ण कार्यासाठी सन्मानित करणे, हा या पुरस्कार देण्यामागचा उद्देश आहे.
यावेळी पेंढरकर यांनी विको लेबॉरेटरीजची यशस्वी यशोगाथा दर्शकांना सांगितली. ते म्हणाले, विको कंपनीचे ‘विको नारायणी क्रीम’ आणि ‘विको हर्बल फेश वॉश’ ही नवीन उत्पादने भारतातच नव्हे तर जगात स्वीकारली गेली आहेत. विकोची सर्व उत्पादने त्या देशातील आरोग्य विभागाच्या आवश्यकतेनुसार विधिवत नोंदणीकृत आहेत.
या पुरस्काराकरिता विजेत्यांची निवड करताना राष्ट्रीय शिक्षा आणि मानव संशाधन विकास संस्थांच्या सोबतच आर्थिक विकास आणि राष्ट्रीय चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या मदतीने संपूर्ण भारतात तसेच विदेशांमध्ये या उत्पादनांची संपूर्ण माहिती, सेवा आणि परियोजनांची माहिती गोळा केली जाते. त्यानंतर त्यांची विश्वसनीयता तपासली जाते. या संस्थेतील प्रत्येक कार्यकारी अधिकारी व सदस्य सल्लागार मंडळाद्वारे प्रत्येक ब्रॅण्डची तपासणी केल्यानंतर, यातून ते निवडले जातात व या पुरस्काराने सन्मानित केले जाते.
सल्लागार मंडळामध्ये गणेश रहाणे, अभिनेता देव मल्होत्रा, हरियाणाचे उद्योगपती डॉ. राजेश धमिजा आणि अनेक नामवंत सदस्यांचा समावेश आहे. (वा.प्र.)