राष्ट्रीय पक्षीदिन; टायगर कॅपिटलमध्ये माेरांच्या अस्तित्वावर संकट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 5, 2022 07:00 AM2022-01-05T07:00:00+5:302022-01-04T21:15:26+5:30
Nagpur News एकेकाळी नागपूरच्या परिसरात माेरांच्या वास्तव्यामुळे ‘पिकाॅक कॅपिटल’ म्हणूनही ओळख मिळावी या मागणीने जाेर धरला हाेता. मात्र त्यांच्या अधिवासावर आलेल्या अनेक संकटामुळे राष्ट्रीय पक्ष्याच्या अस्तित्वावरच संकट आले आहे.
निशांत वानखेडे
नागपूर : उपराजधानीचे क्षेत्र तसे टायगर कॅपिटल म्हणून प्रसिद्ध आहेच पण एकेकाळी नागपूरच्या परिसरात माेरांच्या वास्तव्यामुळे ‘पिकाॅक कॅपिटल’ म्हणूनही ओळख मिळावी या मागणीने जाेर धरला हाेता. मात्र त्यांच्या अधिवासावर आलेल्या अनेक संकटामुळे राष्ट्रीय पक्ष्याच्या अस्तित्वावरच संकट आले आहे.
अनेक प्रकारच्या जैवविविधतेने संपन्न असलेल्या संत्रानगरीचे वातावरण राष्ट्रीय पक्ष्यासाठीही पाेषक ठरले हाेते. दाेनतीन वर्षात या सुंदर पक्ष्याची संख्या १० हजारावर गेली हाेती. एका अंदाजानुसार अंबाझरीच्या ७५० हेक्टर परिसरात २००० च्यावर माेर आहेत. याशिवाय गाेरेवाडा परिसरात २०००, राजभवन परिसरात १०० च्यावर, नारा नारी भागात ३०० ते ३५० च्यावर माेर आहेत. याशिवाय अमरावती राेडवर कृषी विद्यापीठाचा परिसर, दिघाेरी, पारडी, साेनेगाव, साेमलवाडा, मिहान या परिसरात माेरांचे अस्तित्व हाेते. यासह उमरेड राेडवर माेठ्या प्रमाणात माेरांचा अधिवास हाेता. मात्र आता ते दिसेनासे झाले आहेत.
मानद वन्यजीव सदस्य अविनाश लाेंढे यांनी सांगितले, अमरावती राेडवरील गावांमध्ये माेठ्या प्रमाणात माेरांची शिकार हाेत असल्याचे दिसून आले आहे. बाजारगाव, कळमेश्वर भागातही शिकारीचे प्रमाण वाढले आहेत. उमरेड राेडचे चाैपदरीकरण करण्याच्या कामात माेठ्या प्रमाणात वृक्षताेड झाली व येथे राहणाऱ्या माेरांचा अधिवास नष्ट झाला. शिवाय या भागात खदानीची संख्या वाढली असून अवैध उत्खननाचे प्रमाणही वाढले आहे. यामुळे माेरांच्या अधिवासात ढवळाढवळ वाढली असल्याने कधीकाळ मुबलक प्रमाणात दिसणारे माेर दिसेनासे झाले आहेत. दुसरीकडे अंबाझरी किंवा गाेरेवाडा जंगलात सायकल ट्रॅकिंग व इतर गाेष्टींमुळे मानवी डिस्टर्बन्स वाढला असल्याने माेरांनी नागपूरपासून दूर जाण्याचे ठरविले की काय, अशी स्थिती झाली आहे.
जैवविविधता टिकवायची असेल तर अधिवासाचा हाेणारा र्हास आणि डिर्स्टबन्स थांबविणे गरजेचे आहे. विकासकामांना विराेध नाही पण पर्यावरणाची हानी हाेणार नाही, याची काळजी घेणेही तेवढेच महत्त्वाचे आहे. कधीकाळ माेरांची संख्या माेठ्या प्रमाणात हाेती व पिकाॅक कॅपिटल व्हावी, असे वाटत हाेते. मात्र आता माेर कुठे दिसेनासे झाले आहेत.
- अविनाश लाेंढे, मानद वन्यजीव संरक्षक