नागपुरात उद्यापासून संघाची राष्ट्रीय समन्वय बैठक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 2, 2021 04:17 AM2021-09-02T04:17:37+5:302021-09-02T04:17:37+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या देशपातळीवरील समन्वय बैठकीचे नागपुरात आयोजन करण्यात आले आहे. ३ ते ६ ...

National Coordinating Meeting of the Sangh from tomorrow in Nagpur | नागपुरात उद्यापासून संघाची राष्ट्रीय समन्वय बैठक

नागपुरात उद्यापासून संघाची राष्ट्रीय समन्वय बैठक

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या देशपातळीवरील समन्वय बैठकीचे नागपुरात आयोजन करण्यात आले आहे. ३ ते ६ सप्टेंबर दरम्यान रेशीमबाग स्मृतिमंदिर परिसरात हे आयोजन होणार आहे. या बैठकीला सरसंघचालक डॉ. मोहन भागवत, सरकार्यवाह दत्तात्रेय होसबळे यांच्यासह सर्व महत्त्वाचे पदाधिकारी उपस्थित राहतील.

संघाच्या कार्यप्रणालीत बैठकांना मोठे स्थान आहे. दरवर्षी विविध पातळ्यांवर बैठका होत असतात. वर्षभरातील कार्याचा आढावा घेण्यासाठी व काही वर्तमान विषयांवर मंथनासाठी समन्वय बैठकीचे नियमितपणे आयोजन होते. या बैठकीला संघपरिवारातील विविध संघटनांचे प्रतिनिधीदेखील उपस्थित असतात. या बैठकीत वर्षभरातील कामावर प्रकाशझोत टाकण्यात येतो. सोबतच समन्वयाच्या दृष्टीने काही नियोजनदेखील करण्यात येते. भाजपचे प्रतिनिधीदेखील या बैठकीला सहभागी राहणार आहेत. भाजपकडून राष्ट्रीय सरचिटणीस बी. एल. संतोष हे उपस्थित राहण्याची शक्यता आहे.

कोरोनानंतरचे प्रथमच आयोजन

कोरोनामुळे मार्च २०२० पासून नागपुरात मोठ्या बैठकीचे आयोजन झालेले नाही. नागपुरात नियोजित असलेली अखिल भारतीय प्रतिनिधी सभादेखील बंगलोर येथे घेण्यात आली. दरम्यान, दीड वर्षात सरसंघचालकांसह संघाचे विविध पदाधिकारी सातत्याने विविध क्षेत्रांमध्ये जाऊन बैठका घेत होते. एकाच ठिकाणी गर्दी टाळण्यासाठी हे पाऊल उचलण्यात आले होते. कोरोनाचा संसर्ग झाल्यानंतर प्रथमच नागपुरात संघाची राष्ट्रीय पातळीवरील बैठक होत आहे हे विशेष.

Web Title: National Coordinating Meeting of the Sangh from tomorrow in Nagpur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.