नागपूर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात राष्ट्रीय स्तरावरील लॉन टेनिस कोर्ट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 16, 2021 08:26 PM2021-10-16T20:26:26+5:302021-10-16T20:28:39+5:30
Nagpur News शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात (मेडिकल) राष्ट्रीय स्तरावरील लॉन टेनिस कोर्ट व बॉस्केटबॉल कोर्टचे उद्घाटन शनिवारी सकाळी राज्याचे क्रीडा मंत्री सुनील केदार यांच्या हस्ते झाले.
नागपूर : शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात (मेडिकल) राष्ट्रीय स्तरावरील लॉन टेनिस कोर्ट व बॉस्केटबॉल कोर्टचे उद्घाटन शनिवारी सकाळी राज्याचे क्रीडा मंत्री सुनील केदार यांच्या हस्ते झाले. राज्यातील इतर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांच्या तुलनेत हे सर्वांत मोठे व अद्ययावत असलेले टेनिस कोर्ट आहे. (National Level Tennis Court at Nagpur Government Medical College)
कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून आ. मोहन मते उपस्थित होते. मंचावर मेडिकलचे अधिष्ठाता डॉ. सुधीर गुप्ता, वैद्यकीय अधीक्षक डॉ. अविनाश गावंडे, उपअधिष्ठाता डॉ. राज गजभिये, डॉ. उदय नारलावार, शासकीय दंत महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. अभय दातारकर, क्रीडा उपसंचालक डॉ. अरुप मुखर्जी, आदी उपस्थित होते. मानवी जीवनात खेळांचे अनन्यसाधारण महत्त्व आहे. विद्यार्थिदशेत खेळ महत्त्वाचे असतात. खेळांमुळे शारीरिक व्यायामासोबतच बौद्धिक विकासालाही हातभार लागतो. अभ्यासासाठी आरोग्य आणि आरोग्यासाठी खेळ महत्त्वाचा आहे, असे प्रतिपादन क्रीडा मंत्री केदार यांनी यावेळी केले. डॉ. गुप्ता म्हणाले, या लॉन टेनिस व बास्केटबॉल कोर्ट निर्माणामागे माजी अधिष्ठाता डॉ. अभिमन्यू निसवाडे व डॉ. सजल मित्रा यांचे परिश्रम आहे. आता याचा फायदा विद्यार्थ्यांसोबतच शिक्षकांना होणार असल्याचेही ते म्हणाले. यावेळी टेनिस कोर्टसाठी विशेष सहकार्य केल्याबद्दल राकेश बढेरा यांचा सत्कार करण्यात आला.
डॉ. मुकेश वाघमारे यांनी प्रास्ताविक केले. डॉ. प्रगती राठोड व डॉ. वनिता गोल्हर यांनी सूत्रसंचालन केले, तर डॉ. दर्शन दक्षिणदार यांनी आभार मानले. कार्यक्रमाला मेयोच्या अधिष्ठाता डॉ. भावना सोनवणे, माजी अधिष्ठाता डॉ. अजय केवलिया, डॉ. एम. एस. रावत, डॉ. मनोहर मुद्देश्वर, डॉ. प्रशांत पाटील, डॉ. राजेश गोसावी, डॉ. संजय पराते, डॉ. सत्यजित जगताप, डॉ. मो. फैजल, डॉ. सुशांत मेश्राम, डॉ. अशोक दिवान, डॉ. नरेंद्र तिरपुडे, डॉ. वासुदेव बारसागडे, डॉ. संजय सोनुने, डॉ. सतीश दास, डॉ. पी. पी. देशमुख, डॉ. धनंजय सेलुकर, डॉ. विनोद खंडाईत, डॉ. समीर गोलावार, डॉ. उमांजली दमके, डॉ. सौफिया आझाद, मेट्रन वैशाली तायडे, डॉ. कांचन वानखेडे, डॉ. मुरारी सिंह, मार्डचे अध्यक्ष डॉ. सजल बंसल यांच्यासह मोठ्या संख्येत विद्यार्थी उपस्थित होते.
- लॉन टेनिसचा कोर्टवर आठ लेअर
डॉ. गुप्ता म्हणाले, लॉन टेनिस व बास्केटबॉलचा कोर्ट हा इंटरनॅशनल टेनिट फेडरेशन त्याच्या मानकानुसार तयार करण्यात आला आहे. ‘आठ लेअर’चा हा कोर्ट आहे. यामुळे भविष्यात राष्ट्रीय स्तरावरील सामनेही येथे घेता येईल. विशेष म्हणजे, रात्रीच्या वेळीही येथे खेळता यावे अशी सोय आहे.
- लवकरच दीड कोटींचे बॅटमिंटन व व्हॉलिबॉल कोर्ट
मेडिकलमध्ये बॅटमिंटन, व्हॉलिबॉल कोर्ट व जीम निर्माण करण्यासाठी क्रीडा मंत्री सुनील केदार यांनी सहकार्य करण्यास तयारी दर्शविली आहे. यामुळे लवकरच जवळपास दीट कोटीचा प्रस्ताव त्यांच्याकडे पाठविला जाईल, असेही डॉ. गुप्ता म्हणाले.
- शासकीय दंत महाविद्यायातही फुटबॉल व लॉन टेनिस कोर्ट
शासकीय दंत महाविद्यालयाच्यावतीने दंत विद्यार्थ्यांच्या वसतिगृहाच्या परिसरात फुटबॉल व लॉन टेनिस कोर्ट तयार करण्यासाठीचा प्रस्ताव क्रीडा मंत्री केदार यांना देण्यात आला. त्यांच्या वतीने त्यांचे विशेष कार्य अधिकारी यांनी तातडीने निवेदनावर ‘अ’ क्रीडा सुविधा निर्मिती योजनेमधून याला मंजूर प्रदान करण्याची व कारवाई करण्याचा सूचना जिल्हा क्रीडा अधिकाऱ्यांना दिल्या.