राष्ट्रीय ओबीसी महासंघ आंदोलनावर ठाम; मागण्या लेखी स्वरूपात मान्य होईपर्यंत माघार नाही

By कमलेश वानखेडे | Published: September 19, 2023 05:46 PM2023-09-19T17:46:00+5:302023-09-19T17:47:37+5:30

संविधान चौकात उपोषण सुरूच

National OBC Federation insists on agitation | राष्ट्रीय ओबीसी महासंघ आंदोलनावर ठाम; मागण्या लेखी स्वरूपात मान्य होईपर्यंत माघार नाही

राष्ट्रीय ओबीसी महासंघ आंदोलनावर ठाम; मागण्या लेखी स्वरूपात मान्य होईपर्यंत माघार नाही

googlenewsNext

नागपूर : अखिल कुणबी ओबीसी आंदोलन कृती समितीने सोमवारच्या मोर्चानंतर सरकारला एक महिन्याची मुदत देत आंदोलन तूर्तास स्थगित केले. असे असले तरी राष्ट्रीय ओबीसी महासंघातर्फे राज्यभर आंदोलन सुरू असल्यामुळे नागपुरातही संविधान चौकात बेमुदत उपोषण आंदोलन सुरू ठेवण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला. सरकारतर्फे लेखी स्वरुपात मागणी मान्य होईपर्यंत माघार न घेण्याचा निर्धार महासंघाचे अध्यक्ष डॉ. बबनराव तायवाडे यांनी व्यक्त केला.

राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या बॅनरखाली मंगळवारी सकाळी संविधान चौकात आंदोलनास सुरुवात झाली. मंगळवारीही साखळी उपोषण करण्यात आले. राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे अध्यक्ष डॉ बबनराव तायवाडे, डॉ विनोद गावंडे, रमेश राऊत, सुभाष घाटे, अविनाश बांगरे, अशोक काकडे, दौलत शास्त्री, भास्कर पांडे, विजया धोटे, सुरेश कोंगे, हेमंत गावंडे, विजय ठाकरे, शकील पटेल, गेमराज गोमासे, केशव शास्त्री, अरुण वराडे, सुषमा भड, मंगला देशमुख, रामभाऊ कावडकर, शेखर सुटे आदींनी उपोषण केले. संचालन अरुण वराडे यांनी केले. आंदोलनात शरद वानखेडे, विक्रांत मानकर, परमेश्वर राऊत, नाना झोडे, निलेश कोढे, बाबा, ढोबळे, विनोद इंगोले, श्रीराम काळे, प्रकाश इटनकर , राजेश ढेंगे, श्रीकांत मसमारे , राकेश ईखार, गणेश नाखले, गजानन दांडेकर, नाना सातपुते,यांनी सहकार्य केले याप्रसंगी जेष्ठ संपादक महादेव खैरे आदींनी सक्रीय सहभाग घेतला.

Web Title: National OBC Federation insists on agitation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.