राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे महाधिवेशन मुंबईत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 31, 2017 01:37 AM2017-08-31T01:37:59+5:302017-08-31T01:38:16+5:30

राष्ट्रीय ओबीसी महासंघाची आढावा बैठक रविवारी नागपुरात पार पडली. धनवटे नॅशनल कॉलेजच्या सभागृहात राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे संयोजक प्राचार्य डॉ. बबनराव तायवाडे यांच्या अध्यक्षतेत

The National OBC Federation's Mahadavigation in Mumbai | राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे महाधिवेशन मुंबईत

राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे महाधिवेशन मुंबईत

Next
ठळक मुद्देराष्ट्रीय ओबीसी महासंघाचे तिसरे राष्ट्रीय महाधिवेशन मुंबई येथे आयोजित करण्याची घोषणा

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : राष्ट्रीय ओबीसी महासंघाची आढावा बैठक रविवारी नागपुरात पार पडली. धनवटे नॅशनल कॉलेजच्या सभागृहात राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे संयोजक प्राचार्य डॉ. बबनराव तायवाडे यांच्या अध्यक्षतेत आयोजित या बैठकीत राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे तिसरे राष्ट्रीय महाधिवेशन मुंबई येथे आयोजित करण्याची घोषणा करण्यात आली. या बैठकीला राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे राजकीय समन्वयक माजी खासदार डॉ. खुशाल बोपचे, निमंत्रक सचिन राजूरकर मंचावर उपस्थित होते. देशभरातील ओबीसी बांधव राष्ट्रीय ओबीसी महासंघासोबत एकजूट होत असल्याची जाणीव केंद्र सरकारला दिल्ली येथे पार पडलेल्या ७ आॅगस्टच्या दुसºया राष्ट्रीय महाधिवेशनामुळे झाली. म्हणूनच शासनाने नॉन क्रिमीलेअरची मर्यादा सहा लाखांवरून आठ लाखांपर्यंत वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र राज्यघटनेत अशी कुठलीच तरतूद ओबीसींसाठी नसल्याने ही असंवैधानिक अटच रद्द करण्याच्या मागणीवर ओबीसी महासंघ ठाम असल्याची भूमिकाही या बैठकीत घेण्यात आली. या बैठकीत येत्या २६ नोव्हेंबरला विद्यार्थी, युवक व युवतीचे महाधिवेशन घेण्याचे ठरविण्यात आले. या बैठकीला महिला अध्यक्ष सुषमा भड, प्रा. शेषराव येलेकर, युवा अध्यक्ष मनोज चव्हाण, शरद वानखेडे, गुणेश्वर आरीकर, शुभम वाघमारे,नीलेश कोढे,आकाश जावळे,रोशन कुंभलकर,अनघा वानखडे,विनोद हजारे,सोनिया वैद्य, आष्टनकर,अनिता ठेंगरे,कृष्णा देवासे,संजय पन्नासे,नाना लोखंडे,कल्पना मानकर,भय्या रडके,गोविंद वरवाडे,पंकज पांडे,प्रा.एन.जी.राऊत,शकील अहमद पटेल,तिघारे,विजय पटले उपस्थित होते.प्रास्तविक निमंत्रक सचिन राजूरकर यांनी तर आभार संजय पन्नासे यांनी मानले.

Web Title: The National OBC Federation's Mahadavigation in Mumbai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.