राष्ट्रीय जनसंपर्क दिन: अनिल गडेकर बेस्ट पीआरओ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 19, 2019 11:59 PM2019-04-19T23:59:03+5:302019-04-20T00:00:31+5:30

पब्लिक रिलेशन्स सोसायटी ऑफ इंडिया नागपूर चॅप्टरच्यावतीने राष्ट्रीय जनसंपर्क दिनानिमित्त माहिती व जनसंपर्क क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाबद्दल जिल्हा माहिती अधिकारी अनिल गडेकर यांना ‘बेस्ट पी.आर.ओ.’ म्हणून सन्मानित करण्यात येणार आहे.

National Public Relation Day: Anil Gadekar Best PRO | राष्ट्रीय जनसंपर्क दिन: अनिल गडेकर बेस्ट पीआरओ

राष्ट्रीय जनसंपर्क दिन: अनिल गडेकर बेस्ट पीआरओ

Next
ठळक मुद्देमाहिती व जनसंपर्क क्षेत्रात उल्लेखनीय योगदान

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : पब्लिक रिलेशन्स सोसायटी ऑफ इंडिया नागपूर चॅप्टरच्यावतीने राष्ट्रीय जनसंपर्क दिनानिमित्त माहिती व जनसंपर्क क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाबद्दल जिल्हा माहिती अधिकारी अनिल गडेकर यांना ‘बेस्ट पी.आर.ओ.’ म्हणून सन्मानित करण्यात येणार आहे.
राजकारणाचा खालावत जाणारा स्तर, एकमेकांवरील वैयक्तिक आरोप-प्रत्यारोप, राष्ट्रीय हितामध्ये राजकीय मतभेद लक्षात घेता, माध्यमे, जनसंपर्क क्षेत्रातील अधिकारी आणि व्यावसायिकांची भूमिका जबाबदारीची ठरू शकते. जनमानसात लोकशाहीची मूल्ये रुजविणे, लोकशाही विषयक आदर निर्माण करणे आणि लोकशाहीच्या चार स्तंभांमध्ये उत्तम सुसंवाद ठेवण्याचे महत्त्वपूर्ण कार्य जनसंपर्काच्या माध्यमातून व्हावे या उद्देशाने पब्लिक रिलेशन्स सोसायटी ऑफ इंडियाने यावर्षी राष्ट्रीय जनसंपर्क दिनानिमित्त ‘एक राष्ट्र, एक संकल्प, एक स्वर’ हा विषय निश्चित केला आहे.
राष्ट्रीय जनसंपर्क दिनाचा कार्यक्रम येत्या २१ एप्रिल रोजी सकाळी १०.३० वाजता प्रेस क्लब सभागृह, सिव्हील लाईन्स येथे होणार असून प्रमुख अतिथी म्हणून जिल्हाधिकारी अश्विन मुदगल राहतील तर नागपूर प्रेस क्लबचे अध्यक्ष प्रदीपकुमार मैत्र हे अध्यक्षस्थान भूषविणार आहेत.

 

 

 

Web Title: National Public Relation Day: Anil Gadekar Best PRO

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.