बेरोजगारीचा सामना करण्यासाठी व्हावा राष्ट्रीय युवा आयोग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 22, 2018 12:51 AM2018-04-22T00:51:12+5:302018-04-22T00:51:23+5:30

देशातील कोट्यवधी तरुण रोजगारासाठी भटकंती करीत आहेत. अशा परिस्थितीत तरुणांना बेरोजगारीपासून दिलासा देण्यासाठी लवकरात लवकर राष्ट्रीय युवा आयोगाचे गठन करावे, अशी मागणी युवा चेतना संघटना दिल्लीचे राष्ट्रीय संयोजक रोहित कुमार सिंह यांनी केली. नागपूर दौऱ्यावर आलेले असताना सिंह यांनी शनिवारी ‘लोकमत’कार्यालयात विशेष चर्चेदरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे केली.

National Youth Commission to fight unemployment | बेरोजगारीचा सामना करण्यासाठी व्हावा राष्ट्रीय युवा आयोग

बेरोजगारीचा सामना करण्यासाठी व्हावा राष्ट्रीय युवा आयोग

googlenewsNext
ठळक मुद्देयुवा चेतना संघटनेचे राष्ट्रीय संयोजक रोहित कुमार सिंह यांची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्क 
नागपूर : देशातील कोट्यवधी तरुण रोजगारासाठी भटकंती करीत आहेत. अशा परिस्थितीत तरुणांना बेरोजगारीपासून दिलासा देण्यासाठी लवकरात लवकर राष्ट्रीय युवा आयोगाचे गठन करावे, अशी मागणी युवा चेतना संघटना दिल्लीचे राष्ट्रीय संयोजक रोहित कुमार सिंह यांनी केली. नागपूर दौऱ्यावर आलेले असताना सिंह यांनी शनिवारी ‘लोकमत’कार्यालयात विशेष चर्चेदरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे केली.
रोहित कुमार सिंह म्हणाले, राष्ट्रीय युवा आयोगाच्या धर्तीवर राज्यातही युवा आयोग तयार व्हायला हवेत; सोबतच बेरोजगारांना कमीतकमी व्याजदरावर कर्ज पुरवठा करावयास हवा. तरुणांना रोजगार देण्यासाठी केंद्र सरकारच्या हातात सूत्र असावे असे
युवकांबाबतचे धोरण तयार व्हावयास हवे. सध्या देशात बहुतांश राज्यात बेरोजगारी भत्ता देण्यात येत नाही. अशास्थितीत केंद्र सरकारतर्फे हा भत्ता ठरवून राज्य शासनाने त्यावर अंमलबजावणी करण्यावर भर दिला पाहिजे. त्यांनी राजकारणात वाढत्या घराणेशाही विरुद्ध आवाज बुलंद करण्यावर भर दिला. ते म्हणाले, राजकीय घराणेशाहीत सर्व राजकीय पक्ष सामील आहेत. यामुळे सर्व देश पीडित आहे. या घराणेशाही विरुद्ध युवा चेतना संघटना वातावरण तयार करीत आहे. देशाच्या सध्याच्या स्थितीसाठी त्यांनी आधीचे शासन जबाबदार असल्याचे सांगितले.
सरकारी शाळात शिकावीत नेत्यांची मुले
रोहित कुमार सिंह म्हणाले, मागील काही वर्षांत सरकारी शाळांबाबतचे आकर्षण कमी झाले आहे. या शाळा गरिबांच्या मुलांसाठी आहेत, अशी धारणा झाली आहे. ही धारणा बदलविण्यासाठी शासनात सहभागी नेते आणि अधिकाऱ्यांच्या मुलांना सरकारी शाळांमध्ये शिकविण्यासाठी सुरुवात करावी लागेल. देशातील बेरोजगारीसाठी सध्याचे शैक्षणिक धोरण जबाबदार असल्याचे त्यांनी सांगितले. आपल्या वेतनासाठी एकजूट होणाऱ्या देशातील नेत्यांनी चांगले शैक्षणिक धोरण, युवकांबाबतचे धोरण तयार करण्यावर भर द्यावयास हवा. शिक्षणाचे भारतीयकरण होणे गरजेचे आहे.
१५ राज्यांत काम करीत आहे युवा चेतना
रोहित कुमार सिंह यांनी सांगितले की, सध्या युवा चेतना संघटना देशातील १५ राज्यांत राष्ट्रीय विचारधारेसाठी काम करीत आहे. महाराष्ट्रात लवकरच संघटनेचे काम सुरू होणार आहे. संघटनेचे मुख्य कार्यालय दिल्लीत असल्याचे त्यांनी सांगितले.

Web Title: National Youth Commission to fight unemployment

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.