बाजारातून मक्याचे देशी कणीस गायब; सर्वांना वेड ‘स्वीट कॉर्न’चे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 10, 2022 07:54 PM2022-08-10T19:54:20+5:302022-08-10T19:54:57+5:30

Nagpur News गेल्या काही वर्षांत देशी मक्याचे वाण बाजारात फार कमी बघायला मिळते. त्याच्या जागी आता स्वीट कॉर्नची मागणी वाढली आहे.

Native maize corn disappears from the market; Everyone is crazy about 'sweet corn' | बाजारातून मक्याचे देशी कणीस गायब; सर्वांना वेड ‘स्वीट कॉर्न’चे

बाजारातून मक्याचे देशी कणीस गायब; सर्वांना वेड ‘स्वीट कॉर्न’चे

googlenewsNext
ठळक मुद्देहायब्रीड वाणाला मागणी वाढली


नागपूर : पावसाळ्यात गमरागरम, लुसलुशीत तिखट भुट्ट्याची मजा काही वेगळीच असते. शहरातील पर्यटनाच्या स्थळावर व मुख्य रस्त्यावरही कोळशाच्या शेगडीवर भुट्टे भाजून त्यावर निंबू पिळून लोकं आस्वाद घेताना बघायला मिळायचे; पण गेल्या काही वर्षांत देशी मक्याचे वाण बाजारात फार कमी बघायला मिळते. त्याच्या जागी आता स्वीट कॉर्नची मागणी वाढली आहे. त्यामुळे हातठेल्यावर भुट्टे भाजणारे फार कमी दिसत असून, स्वीट कॉर्नची विक्री करणारे रस्त्याच्या कडेला दिसून येत आहेत.

- २५ रुपयांना एक भुट्टा

शहरात स्वीट कॉर्नची मागणी वाढली आहे. टपोरे दाणे आणि लुसलुशीतपणामुळे खायला तो जास्त आवडतो. त्यामुळे लोक स्वीट कॉर्नची मागणी करतात. सध्या स्वीट कॉर्नचा एक भुट्टा २५ रुपयाला मिळत आहे.

- मक्याचे देशी वाण गायब

हॉटेल इंडस्ट्रीमध्ये स्वीट कॉर्नला अधिक मागणी आहे. सूप तयार करण्यासाठी अधिक सोयीचे असते. बैठ्या जीवनशैलीमुळे देशी भुट्टे पचायला जड जातात. देशी मक्याचे वाण हातठेल्यावरच भाजून खाण्यात टेस्ट येते. घरी भाजून भुट्टे खाण्यात मजा येत नसल्याचे सांगतात. त्यामुळे देशी मक्याचे वाण कमी झाले आहे.

- हायब्रिड वाणाला मागणी

इंडियन इन्स्टिट्युट ऑफ मिलेट रिसर्चच्या एका शास्त्रज्ञाने सांगितले की, पारंपरिक वाणांच्या तुलनेत हायब्रीड वाणांचे खात्रीशीर उत्पादन असल्याने मागणी जास्त असते. बेबी कॉर्न आणि पॉप कॉर्न तयार करण्यासाठी स्वीट कॉर्न वापरले जाते.

- यंदा देशी भुट्ट्याचा पुरवठा नाही. त्यामुळे हातठेल्यावर ठेवायलाही परवडत नाही. हंगामाच्या सुरुवातीला हातगाड्यांवर देशी व्हरायटीचा मका ठेवला होता; पण खरेदीदार नव्हते. त्यामुळे स्वीट कॉर्न विकायला आणले. लोकांची मागणीही वाढली आहे.

दिलीप पाटील, भुट्टे विक्रेते

Web Title: Native maize corn disappears from the market; Everyone is crazy about 'sweet corn'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :foodअन्न