नागपुरातील गोरेवाडा जंगलाच्या स्वच्छतेसाठी निसर्गप्रेमींचे श्रमदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 20, 2019 01:13 PM2019-05-20T13:13:30+5:302019-05-20T13:16:09+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : वन्यजीव, विविध प्रजातीचे सुंदर पक्षी यांचा अधिवास आणि मनमोहक अशा निसर्ग सौंदर्याने नटलेले गोरेवाडा ...

Nature lovers mission for cleanliness of Gorevada forest in Nagpur | नागपुरातील गोरेवाडा जंगलाच्या स्वच्छतेसाठी निसर्गप्रेमींचे श्रमदान

नागपुरातील गोरेवाडा जंगलाच्या स्वच्छतेसाठी निसर्गप्रेमींचे श्रमदान

Next
ठळक मुद्देजंगल ट्रॅकर्स टीमची दररोज स्वयंस्फूर्त सेवा१२ गाडी प्लास्टिक व कचरा गोळा


लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : वन्यजीव, विविध प्रजातीचे सुंदर पक्षी यांचा अधिवास आणि मनमोहक अशा निसर्ग सौंदर्याने नटलेले गोरेवाडा जंगल नागरिकांसाठी खरोखर शहरात असलेला निसर्गाचा अमूल्य ठेवा आहे. पण काही सौंदर्यद्वेष्ट्या लोकांचा बेजबाबदारपणा व वन प्रशासनाच्या उदासीनतेची लागण यालाही झाली. प्लास्टिक व इतर कचऱ्याच्या कुरुपतेचे ग्रहण या जंगलालाही लागले. ही दैनावस्था येथे दररोज फिरणाऱ्या व जंगलावर प्रेम करणाऱ्या निसर्गप्रेमींच्या मनाला खिन्न करणारी होती. गरजेप्रमाणे त्यांनीही आधी प्रशासनाला निवेदने दिली. पण काही फायदा होत नसल्याचे पाहून इतरांसारखे गप्प बसण्यापेक्षा त्यांनी स्वयंस्फूर्तीने श्रमदानातून बदलाचा मार्ग स्वीकारला आणि १५ दिवसात जंगलाला त्याचे नैसर्गिक सौंदर्य बहाल केले.
ही प्रेरणा स्वयंस्फूर्तीची आहे. नागरिकांनी विचार केला तर काय होऊ शकते, याचे प्रेरणादायी दर्शन आहे. बदल घडविणाऱ्या या निसर्गप्रेमींनी आपल्या टीमला ‘गोरेवाडा जंगल ट्रॅकर्स परिवार’ असेच नामकरण केले आहे. टीमलीडर दीपक तभाने यांच्या नेतृत्वातील परिवारामध्ये डॉक्टर्स, इंजिनियर, नोकरदार, व्यापारी व विद्यार्थीही आहेत. त्यांच्या श्रमदानाचा हा प्रवास होय. नैसर्गिक सौंदर्य लाभलेले गोरेवाडा जंगल पर्यटकांसाठी आणि या परिसरातील नागरिकांसाठी पिकनिकचे ठिकाण. पण त्यांच्यासोबत येणाऱ्या कचऱ्याने या जंगलाचे सौंदर्यच नष्ट केले होते. वॉकिंग ट्रॅक आणि जंगलाचा परिसर प्लास्टिकच्या पिशव्या, बॉटल्स व इतर कचऱ्याने व्यापला होता. हा कचरा कुरुपता पसरविणारा तसा वन्यजीवांनाही घातक. हा कचरा गोरेवाडा तलावातही पसरलेला.
दररोज सकाळ-सायंकाळ फिरायला येणाऱ्या गोरेवाडा ट्रॅकर्सच्या टीमला हे दृष्य उदास करीत होते. सुरुवातीला त्यांनी पालकमंत्री, या क्षेत्रातील आमदार आणि वनविभागाचे व प्राणिसंग्रहालयाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना जंगलाच्या स्वच्छता व व्यवस्थेसाठी निवेदने दिली. पालकमंत्र्यांनी व्यवस्थेचे आदेशही दिले पण स्थिती बदलण्याचे चिन्ह दिसत नव्हते. मग या टीमने एक दिवस निर्धार केला. किमान अस्वच्छतेची परिस्थिती आपणच बदलायची आणि ते कामाला लागले. दररोज शक्य होईल त्यांनी सकाळी व संध्याकाळी घरून मोठे पोते घेऊन यायचे. फिरण्याच्या संपूर्ण परिसरातील प्लास्टिक, बॉटल्स व इतर कचरा त्यांनी गोळा करायला सुरुवात केली. हा नित्यक्रम गेल्या १६ दिवसांपासून दररोज सुरू आहे. या टीममध्ये नंतर नगरसेवक हरीश ग्वालबंशी सहभागी झाले. या टीममध्ये नंतर नगरसेवक हरीश ग्वालबंशी सहभागी झाले. टीमद्वारे वेचलेला कचरा येथे असलेल्या मंदिराजवळ गोळा करायचा व त्यानंतर या कचऱ्याची उचल करण्यासाठी महापालिकेच्या गाडीची व्यवस्था ग्वालबंशी यांनी केली. गेल्या १५ दिवसात कचऱ्याने भरलेल्या १० ते १२ गाड्या या जंगलातून रवाना झाल्या आणि जंगलाचा काही परिसर पूर्वीसारखा चकचकीत झाला.
ट्रॅकर्स परिवारचे अध्यक्ष तभाने, सचिव एल.एन. मराठे व कोषाध्यक्ष घनश्याम मांगे यांच्यासह इंदूभाऊ ठाकू र, अरुण कदम, अविनाश कपाले, दिनेश टेंभुर्णे, वासू अण्णा, संजय सोनोने, संजीव शेडके, दीपक तभाने, शिवदास वाघमारे आदी निसर्गप्रेमींच्या पुढाकाराने शहरातील सौंदर्याचा ठेवा अबाधित ठेवण्याची प्रेरणा दिली आहे.
प्रशासनाने हे तरी करावे
जंगल परिसरात जसा लोकांच्या घरातून येणारा कचरा पसरला आहे तसा गोरेवाडा तलावातही या कचऱ्याचे ढिगारे साचले आहेत. पावसाळ्यात दाभा व असापासच्या परिसरातून गटारी व सिवरेजच्या माध्यमातून मलमूत्र, घाण व प्लास्टिक कचरा तलावात जमा होतो व पाणी पुरवठा होणाऱ्या फिल्टर प्लान्ट पर्यंत पोहचतो. प्रशासनाने यासाठी उपाययोजना करण्याचे आवाहन टीमने केले आहे.

Web Title: Nature lovers mission for cleanliness of Gorevada forest in Nagpur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.