चाचेर येथील मुख्य मार्गाला डबक्याचे स्वरुप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 17, 2021 04:13 AM2021-09-17T04:13:12+5:302021-09-17T04:13:12+5:30

लाेकमत न्यूज नेटवर्क रेवराल : चाचेर (ता. माैदा) गावात प्रवेश करणाऱ्या मुख्य मार्गावर माेठ्या प्रमाणात खड्डे तयार झाले असून, ...

The nature of the puddle on the main road at Chacher | चाचेर येथील मुख्य मार्गाला डबक्याचे स्वरुप

चाचेर येथील मुख्य मार्गाला डबक्याचे स्वरुप

googlenewsNext

लाेकमत न्यूज नेटवर्क

रेवराल : चाचेर (ता. माैदा) गावात प्रवेश करणाऱ्या मुख्य मार्गावर माेठ्या प्रमाणात खड्डे तयार झाले असून, त्यात पावसाचे पाणी साचल्याने याला डबक्याचे स्वरुप प्राप्त झाले आहे. त्यामुळे रहदारीस अडसर निर्माण हाेत असल्याने स्थानिक नागरिक वैतागले आहेत. या मार्गाच्या दुरुस्तीकडे प्रशासनाने दुर्लक्ष केल्याचा आराेपही नागरिकांनी केला आहे.

चाचेर हे माैदा तालुक्यातील माेठे व महत्त्वाचे एक आहे. गावातील बसस्टाॅप जे बाजार चाैकाला जाेडणारा मार्ग हा मुख्य व वर्दळीचा मार्ग आहे. काही वर्षापूर्वी या मार्गाचे डांबरीकरण करण्यात आले आले हाेते. मध्यंतरी या मार्गाच्या दुरुस्तीकडे दुर्लक्ष करण्यात आल्याने त्यावर खड्डे तयार झाले आणि ते वेळीच बुजविण्यात न आल्याने त्यांचा आकार दिवसेंदिवस वाढत गेला.

या खड्ड्यांमध्ये पावसाचे पाणी साचल्याने संपूर्ण राेडला डबक्यांचे स्वरुप प्राप्त झाले आहे. या डबक्यांमधून मार्गक्रमण करताना वाहनचालकांसह पादचाऱ्यांच्या नाकीनऊ येत आहे. शिवाय, अपघातही घडत आहेत. एवढेच नव्हे तर वाहनांच्या चाकांमुळे डबक्यांमधील गढूळ पाणी व चिखल पादचाऱ्यांच्या कपड्यांवर उडत असल्याने मनस्तापही सहन करावा लागत आहे.

ही समस्या साेडविण्यासाठी या मार्गाची दर्जेदार दुरुस्ती करावी. पावसामुळे ते शक्य नसल्याने तातडीने खड्डे बुजवावे, अशी मागणी जिल्हा परिषद सदस्य कैलास बरबटे यांच्यासह नागरिकांनी केली असून, रामटेक-चाचेर या मुख्य मार्गावर रास्ता राेकाे आंदाेलन करण्याचा इशारा त्यांनी दिला आहे.

...

पावसामुळे दुरुस्तीला विलंब

या मार्गावर तयार झालेल्या खड्ड्यांबाबत नागरिकांनी सार्वजनिक बांंधकाम विभागाकडे वारंवार तक्रारी केल्या. तक्रारींची दखल घेत या मार्गाच्या दुरुस्तीसाठी २० लाख रुपये मंजूर करण्यात आले. सततच्या पावसामुळे मार्गाच्या दुरुस्तीचे काम करणे शक्य नाही, अशी माहिती सार्वजनिक बांंधकाम विभागातील अधिकाऱ्यांनी दिली. दुसरीकडे, या मार्गाची लगेच दुरुस्ती करणे शक्य नसल्यास प्रशासनाने निदान खड्डे तरी बुजवावे, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

150921\5152img-20210915-wa0067.jpg

चाचेर मार्ग खड्यात फोटो

Web Title: The nature of the puddle on the main road at Chacher

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.