जिल्हा बँकेला नवसंजीवनी

By Admin | Published: March 15, 2016 04:51 AM2016-03-15T04:51:35+5:302016-03-15T04:51:35+5:30

केवळ शेतकऱ्यांना बँकेच्या विविध सवलतीचा फायदा व्हावा, या उद्देशाने राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय

Navajnavi by district bank | जिल्हा बँकेला नवसंजीवनी

जिल्हा बँकेला नवसंजीवनी

googlenewsNext

नागपूर : केवळ शेतकऱ्यांना बँकेच्या विविध सवलतीचा फायदा व्हावा, या उद्देशाने राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या प्रयत्नांमुळे रिझर्व्ह बँकेने नागपूरच्या नागपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला आपला कारभार सुरू करण्याची परवानगी दिली. त्यामुळे यंदाच्या खरीप हंगामात शेतकऱ्यांना कर्ज मिळण्याची प्रक्रिया लवकरच सुरू होणार आहे.
बँकेचे कार्यक्षेत्र नागपूर जिल्हा
सोमवारी रिझर्व्ह बँकेने जिल्हा बँकेला आपला कारभार पुन्हा सुरू करण्याची परवानगी बहाल करताना दोन अटी घालून दिल्या आहेत. या बँकेची कार्यकक्षा फक्त नागपूर जिल्हाच राहणार आहे. तसेच परवान्याची प्रत बँकेला प्राप्त झाल्यानंतर बँक आपले दैनंदिन काम सुरू करू शकेल.
राज्यात काँग्रेस-राष्ट्रवादीचे आघाडी सरकार असताना बँकेत १५० कोटींचा घोटाळा झाला होता. त्यानंतर बँकेवर प्रशासक नेमण्यात आला होता. प्रशासकाच्या काळातही घोटाळे झाल्यामुळे अनेकांनी गुंतवणूक केलेल्या रकमा बँकेकडे अडकल्या. शेतकऱ्यांना मिळणारे कर्ज थांबले. अनेक कर्मचाऱ्यांचे पगारही थांबले होते. शेतकऱ्यांचे बरेच नुकसानही बँक बंद झाल्यामुळे झाले.
१५ मार्चपर्यत नागपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक सुरू करण्यात येईल, असे आश्वासन बावनकुळे यांनी नागपूरच्या परिसरातील शेतकऱ्यांना दिले होते. तसेच मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून या बँकेचा कामकाज सुरू करण्यासाठी आवश्यक असलेला निधी मिळवून देण्यासाठी शासन दरबारी पुढाकार घेतला. अनेक बैठका झाल्यानंतर शासनाने बँकेला काही निधी देण्याची तयारी दर्शविली.
कर्ज फेडणाऱ्या शेतकऱ्यांनाच कर्ज मिळणार
बँकेचे आर्थिक व्यवहार सुरू होताच आॅक्टोबरनंतर कर्ज फेडणाऱ्या शेतकऱ्यांनाच कर्ज वाटप करण्यात येणार असल्याची माहिती आहे. पूर्वी कर्जाचा भरणा केलेल्या वा आता करीत असलेल्यांचा नंतर विचार करण्यात येणार आहे. मार्चच्या प्रारंभीपासूनच १०० कोटी, त्यानंतर ५० कोटींचे कर्ज वाटप करण्यात येणार आहे. बँक सुरू होताच एनपीए कमी होणार आहे. एक लाखापर्यंत शून्य टक्के आणि दोन लाखांपर्यंत दोन टक्के व्याजदराने कर्जवाटप होणार आहे. याशिवाय ठेवी परतची प्रक्रिया रिझर्व्ह बँकेचे नियम आणि अटींनुसारच होईल.(प्रतिनिधी)

शासनाने आश्वासन पाळले
रिझर्व्ह बँकेने आता बँक चालविण्यासाठी परवाना दिल्यामुळे शेतकऱ्याच्या हक्काची बँक असलेल्या एनडीसीसी बँक पुन्हा जिवंत झाली आहे. नागपूर भागातील शेतकऱ्यांना आता बँकेच्या सर्व योजनांचा लाभ घेता येणार आहे. अनेकांना वेळोवेळी कर्जेही उपलब्ध होतील. शेतकऱ्यांसाठी ही बँक सुरू होणे अत्यंत गरजेचे होते. शासनाने दिलेले आश्वासन नियोजित वेळेत पाळले. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.

Web Title: Navajnavi by district bank

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.