नवोदय अर्बन बँक घोटाळा : अशोक धवड यांना सर्वोच्च न्यायालयातही दणका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 18, 2019 10:25 PM2019-10-18T22:25:58+5:302019-10-18T22:27:31+5:30

ठेवीदारांच्या पैशांवर डल्ला मारणारे नवोदय अर्बन को-ऑपरेटिव्ह बँके चे अध्यक्ष व माजी आमदार अशोक शंकर धवड (६५) यांना सर्वोच्च न्यायालयातही दणका बसला आहे. सर्वोच्च न्यायालयाने त्यांना अटकपूर्व जामीन मंजूर करण्यास नकार दिला आहे.

Navodaya Urban Bank scandal: Ashok Dhawad hammered by the Supreme Court | नवोदय अर्बन बँक घोटाळा : अशोक धवड यांना सर्वोच्च न्यायालयातही दणका

नवोदय अर्बन बँक घोटाळा : अशोक धवड यांना सर्वोच्च न्यायालयातही दणका

Next
ठळक मुद्देअटकपूर्व जामिनास नकार 

लोकमत  न्यूज  नेटवर्क
नागपूर : ठेवीदारांच्या पैशांवर डल्ला मारणारे नवोदय अर्बन को-ऑपरेटिव्ह बँके चे अध्यक्ष व माजी आमदार अशोक शंकर धवड (६५) यांना सर्वोच्च न्यायालयातही दणका बसला आहे. सर्वोच्च न्यायालयाने त्यांना अटकपूर्व जामीन मंजूर करण्यास नकार दिला आहे.
गेल्या ३१ जुलै रोजी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने धवड यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळून लावला होता. त्याविरुद्ध धवड यांनी सर्वोच्च न्यायालयात अपील दाखल केले होते. न्यायमूर्तीद्वय संजय कौल व के. एम. जोसेफ यांनी ते अपील खारीज केले. धवड यांना पोलीस ठाण्यात आत्मसमर्पण व सत्र न्यायालयात नियमित जामिनासाठी अर्ज दाखल करण्यासाठी तीन आठवडे वेळ देण्यात आला आहे. बँकेत ३८ कोटी ७५ लाख २० हजार ६४१ रुपयांचा घोटाळा झाला असून या प्रकरणात धंतोली पोलिसांनी १५ मे २०१९ रोजी श्रीकांत सुपे (५७) यांच्या तक्रारीवरून भादंविच्या कलम ४०६, ४०९, ४२०, १२०-ब, ४६५, ४६७, ४६८, ४७१, ४७७-अ यासह एमपीआयडी कायदा व माहिती तंत्रज्ञान कायद्यांतर्गत एफआयआर नोंदवला आहे. २०१४-१५ मध्ये बँकेतून ४ कोटी ३ लाख रुपयांची उचल करण्यात आली व बनावट कागदपत्राच्या आधारे ती रक्कम बँकेला परत केल्याचे दाखवण्यात आले. अशा विविध प्रकारे बँकेत घोटाळा करण्यात आला.

Web Title: Navodaya Urban Bank scandal: Ashok Dhawad hammered by the Supreme Court

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.