नवरात्र पुढ्यात अन् आईचा चमत्कार! जमिनीतून निघाला जगदंबेचा मुखवटा..
By नरेश डोंगरे | Published: October 11, 2023 12:36 AM2023-10-11T00:36:52+5:302023-10-11T00:38:24+5:30
व्हिडीओ सोशल मिडियावर झपाट्याने व्हायरल
नरेश डोंगरे, लोकमत न्यूज नेटवर्क, नागपूर: आई जगदंबेचे नवरात्र पुढ्यात आहे. देशभरातील भाविकांकडून देवीची आराधना करण्यासाठी आणि नवरात्रोत्सव साजरा करण्यासाठी वेगवेगळे कार्यक्रम, उपक्रम आयोजित करण्यात येणार असून त्याची सर्वत्र जोरात तयारी सुरू आहे. नागपूर शहरातही भाविक मंडळी भक्ती आणि आराधनेच्या पर्वाची पूर्वतयारी करण्यात गुंतले असताना मंगळवारी रात्री एक व्हिडीओ सोशल मिडियावर झपाट्याने व्हायरल झाला. अत्यंत देखणी अशी माता जगदंबेची मूर्ती (मुखवटा) जमिनीतून वर आल्याचे या व्हिडीओत दिसत असून, या मुर्तीची पूजा अर्चना करताना मोठ्या संख्येत भाविक दिसत आहे. नागपूर शहरातील समता नगरात हा चमत्कार झाला असल्याचा मेसेजही या व्हिडीओ सोबत संलग्न आहे. मात्र, ही चमत्कारिक घटना नागपूर शहरातच घडली की आणखी कुठे त्याची मध्यरात्रीपर्यंत शहानिशा होऊ शकली नाही.
नवरात्र पुढ्यात अन् आईचा चमत्कार! जमिनीतून निघाला जगदंबेचा मुखवटा.. (Video- नरेश डोंगरे)#Navratri2023#Nagpurpic.twitter.com/xXCjRaTuwd
— Lokmat (@lokmat) October 10, 2023