नक्षलबंदमुळे शेतीची कामे प्रभावित

By admin | Published: July 30, 2014 01:16 AM2014-07-30T01:16:59+5:302014-07-30T01:16:59+5:30

माओवादी संघटनांतर्फे २८ जुलै ते ३ आॅगस्ट या कालावधीत नक्षल शहीद सप्ताह साजरा केला जात आहे. या सप्ताह पाळण्याचे आवाहन नक्षल्यांनी जिल्हाभरात पत्रके टाकून केले आहे. त्यामुळे सोमवारपासून

Naxal activities affect the farming activities | नक्षलबंदमुळे शेतीची कामे प्रभावित

नक्षलबंदमुळे शेतीची कामे प्रभावित

Next

बसफेऱ्या बंद : राज्य परिवहन महामंडळाला दररोज पाच हजाराचा फटका
गडचिरोली : माओवादी संघटनांतर्फे २८ जुलै ते ३ आॅगस्ट या कालावधीत नक्षल शहीद सप्ताह साजरा केला जात आहे. या सप्ताह पाळण्याचे आवाहन नक्षल्यांनी जिल्हाभरात पत्रके टाकून केले आहे. त्यामुळे सोमवारपासून दुर्गम भागातील गावात शेतीची तसेच रोवणीची कामे बंद पडली आहे. राज्य परिवहन महामंडळाच्या दोन आगारांनी जवळजवळ २० बसफेऱ्याही बंद केल्यामुळे महामंडळाला दररोज ५ ते ६ हजार रूपयाच्या उत्पन्नाचा फटका बसत आहे. तसेच दुर्गम गावातील लोकांना दळणवळणाची सेवाही मिळणे कठीण झाले आहे.
नक्षल्यांकडून शहीद सप्ताहादरम्यान घातपाताच्या कारवाया करण्याची शक्यता राहते. सप्ताहादरम्यान नक्षल्यांकडून बंदचे आवाहनही करण्यात आल्याने दहशतीमुळे नागरिक बंदमध्ये सहभागी होतात. या बंदमुळे धानोरा, कोरची, भामरागड, एटापल्ली, अहेरी या तालुक्यातील अतिदुर्गम भागातील रोवण्याचे काम सोमवारपासून नागरिकांनी बंद ठेवले आहेत. त्याचबरोबर राज्य परिवहन महामंडळाने धानोरा तालुक्यातील मुरूमगावच्या समोर छत्तीसगड राज्यात जाणाऱ्या आंतरराज्यीय बसफेऱ्या बंद केल्या आहेत. कुरखेडा तालुक्यातील पुराडा, चामोर्शी तालुक्यातील घोटपर्यंतच बसफेऱ्या नेण्यात येत आहेत. दुर्गम भागातील बसफेऱ्या सोमवारपासून बंदच ठेवण्यात आल्या आहेत. परिणामी प्रवाशांनाही बऱ्याच अडचणीचा सामना करावा लागत आहे. एसटी महामंडळाला दिवसाचा ५ ते ६ हजार रूपयाचा फटका बसत आहे. काही भागात पोलीस स्टेशनला विचारणा केल्यानंतरच बसफेऱ्या पाठविण्यात येत आहेत, अशी माहिती आहे. (नगर प्रतिनिधी)

Web Title: Naxal activities affect the farming activities

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.