नक्षलग्रस्त सीमा करणार सील : आंतरराज्यीय समन्वय बैठकीत निर्णय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 25, 2018 12:04 AM2018-10-25T00:04:01+5:302018-10-25T00:06:46+5:30

पोलीस आणि सुरक्षा दल हे निवडणुकीत हिंसक घटना घडविण्याची नक्षलवाद्यांची योजना कुठल्याही परिस्थितीत यशस्वी होऊ देणार नाही. नक्षलवलाद्यांच्या योजनेवर पाणी फेरण्यासाठी निवडणुकी दरम्यान राज्यातील नक्षलप्रभावित सीमा सील केल्या जातील. यादरम्यान नक्षलवाद्यांद्वारे निवडणुकीत बाधा निर्माण करण्याच्या दृष्टीने होणाऱ्या छोट्यातल्या छोट्या घटनेचेही सडेतोड उत्तर दिले जाईल. नक्षलविरोधी अभियानातर्फे सुराबर्डी येथील अपारंपरिक अभियान प्रशिक्षण केंद्रात पार पडलेल्या शेजारी राज्यांच्या आंतरराज्य समन्वय बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.

Naxal-affected border be sealed: Decision in inter-state coordination meeting | नक्षलग्रस्त सीमा करणार सील : आंतरराज्यीय समन्वय बैठकीत निर्णय

नक्षलग्रस्त सीमा करणार सील : आंतरराज्यीय समन्वय बैठकीत निर्णय

Next
ठळक मुद्देनक्षलवाद्यांच्या योजना पूर्ण होऊ देणार नाही

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : पोलीस आणि सुरक्षा दल हे निवडणुकीत हिंसक घटना घडविण्याची नक्षलवाद्यांची योजना कुठल्याही परिस्थितीत यशस्वी होऊ देणार नाही. नक्षलवलाद्यांच्या योजनेवर पाणी फेरण्यासाठी निवडणुकी दरम्यान राज्यातील नक्षलप्रभावित सीमा सील केल्या जातील. यादरम्यान नक्षलवाद्यांद्वारे निवडणुकीत बाधा निर्माण करण्याच्या दृष्टीने होणाऱ्या छोट्यातल्या छोट्या घटनेचेही सडेतोड उत्तर दिले जाईल. नक्षलविरोधी अभियानातर्फे सुराबर्डी येथील अपारंपरिक अभियान प्रशिक्षण केंद्रात पार पडलेल्या शेजारी राज्यांच्या आंतरराज्य समन्वय बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.
या बैठकीत महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळाचे पोलीस महासंचालक व व्यवस्थापकीय संचालक डी. कन्नकरत्नम, मध्य प्रदेश राज्याचे पोलीस महासंचालक व्ही. के. सिंग, राज्याचे विशेष कृतीचे अतिरिक्त पोलीस महासंचालक संजय सक्सेना, पोलीस आयुक्त डॉ. भूषणकुमार उपाध्याय, नक्षल विरोधी अभियानाचे विशेष पोलीस महानिरीक्षक शरद शेलार, गडचिरोली परिक्षेत्राचे पोलीस उपमहानिरीक्षक अंकुश शिंदे प्रामुख्याने उपस्थित होते.
तेलंगणा, छत्तीसगड आणि मध्य प्रदेशात विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत. यादरम्यान नक्षलवाद्यांकडून हिंसक घटना घडविण्याची शक्यता आहे. या तिन्ही राज्यांच्या सीमा महाराष्ट्राला लागून आहेत. महाराष्ट्रातील गडचिरोली या जिल्ह्यातही नक्षलवादी सक्रिय आहेत. या पार्श्वभूमीवर एएनओ सुराबर्डी परिसरात बैठक आयोजित करण्यात आली होती. कणकरत्नम यांनी तिन्ही राज्याच्या पोलीस प्रमुखांना निवडणुका शांततेत पार पाडण्यासाठी सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले.
या बैठकीत नक्षल्यांच्या हिंसेला उत्तर देण्यासाठी सुरक्षा दलाने नेहमी अलर्ट राहावे तसेच आपसात माहितीचे आदान-प्रदान करण्याबाबत निर्णय घेण्यात आला.
या बैठकीत बालाघाटचे केंद्रीय राखीव पोलीस दलाचे विशेष पोलीस महानिरीक्षक टी. शेखर, ग्रे हाऊन्डचे विशेष पोलीस महानिरीक्षक श्रीनिवासन रेड्डी, जबलपूरचे विशेष पोलीस महानिरीक्षक अनंत कुमार सिंग, बीएसएफचे विशेष पोलीस महानिरीक्षक जे.बी. संगवान, बालाघाटचे विशेष पोलीस महानिरीक्षक के.पी. वेंकटेश्वरराव, पोलीस उपमहानिरीक्षक इर्शाद अली, छत्तीसगडचे पोलीस उपमहानिरीक्षक सुंदरराज पी. , गडचिरोलीचे पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे, गोंदियाचे पोलीस अधीक्षक हरीश बैजल यांच्यासह आयटीबीपी, बीएसएफ, सीआरपी व छत्तीसगड, मध्य प्रदेश व तेलंगणा येथील पोलीस अधीक्षक उपस्थित होते.

डीजीपी पोहोचलेच नाही
पोलीस महासंचालक (डीजीपी) दत्ता पडसलगीकर हे या बैठकीचे नेतृत्व करणार होते. त्यांना गुप्तहेर शाखेत काम करण्याचा दीर्घ अनुभव आहे. त्यामुळे ते या बैठकीला येतील, अशी शक्यता वर्तविली जात होती. परंतु केंद्र सरकारचे एक प्रमुख प्रतिनिधीमंडळ त्यांना भेटण्यासाठी मुंबईत आले आहे. त्यामुळे पडसलगीकर बैठकीत येऊ शकले नाही.

 

Web Title: Naxal-affected border be sealed: Decision in inter-state coordination meeting

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.