नयनतारा सहगल प्रकरण : नागपूर विद्यापीठाच्या शिक्षकांवर पडणार गाज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 13, 2019 01:16 AM2019-01-13T01:16:29+5:302019-01-13T01:17:55+5:30

अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात ज्येष्ठ लेखिका नयनतारा सहगल यांचे निमंत्रण रद्द केल्याच्या निर्णयाविरोधात राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या शैक्षणिक परिसरात मराठी विभागातर्फे एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाची परवानगीच घेण्यात न आल्याने, कार्यक्रमाच्या आयोजनावरून शिक्षकांवर गाज पडणार आहे.

Nayantara Sahgal case: Nagpur University teachers will be punished | नयनतारा सहगल प्रकरण : नागपूर विद्यापीठाच्या शिक्षकांवर पडणार गाज

नयनतारा सहगल प्रकरण : नागपूर विद्यापीठाच्या शिक्षकांवर पडणार गाज

Next
ठळक मुद्देविना परवानगी आयोजित केला निषेधाचा कार्यक्रम

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात ज्येष्ठ लेखिका नयनतारा सहगल यांचे निमंत्रण रद्द केल्याच्या निर्णयाविरोधात राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या शैक्षणिक परिसरात मराठी विभागातर्फे एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाची परवानगीच घेण्यात न आल्याने, कार्यक्रमाच्या आयोजनावरून शिक्षकांवर गाज पडणार आहे.
विद्यापीठ प्रशासनाच्या अधिकाऱ्यांकडून मिळालेल्या माहितीनुसार, कार्यक्रमासाठी विद्यापीठ प्रशासनाकडून कुठलीही परवानगी घेण्यात आली नव्हती. त्यामुळे विद्यापीठ प्रशासन कार्यक्रमाच्या आयोजनात सहभागी असलेल्यांवर कारवाई करण्याच्या तयारीत आहे. शक्यता आहे की त्यांना सोमवारपर्यंत नोटीस जारी करण्यात येईल. सूत्रांच्या मते, गेल्या वर्षी विद्यापीठ प्रशासनाने एक परिपत्र जारी केले होते. परिपत्रानुसार विद्यापीठाच्या कुठलाही शैक्षणिक विभाग व संचालित महाविद्यालयांनी कुठल्याही कार्यक्रमाचे आयोजन करण्यापूर्वी त्याची पूर्वसूचना अथवा परवानगी घेणे अनिवार्य आहे. त्यानंतरही विना परवानगीने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. सूत्रांच्या मते, हा कार्यक्रम तीन शैक्षणिक विभागाच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केला होता. कार्यक्रमात विभागप्रमुख व शिक्षकही सहभागी झाले होते. कार्यक्रमात सरकारच्या विरोधात वक्तव्य करण्यात आले होेते. कार्यक्रमाच्या आयोजनाशी जुळलेल्या विद्यार्थ्यांच्या मते, कार्यक्रमादरम्यान एक निषेध प्रस्ताव पारित करण्यात आला. कार्यक्रमाच्यासंदर्भात मराठी विभागप्रमुख डॉ. प्रमोद मुनघाटे यांनी आयोजनाची पुष्टी केली. परंतु त्यांनी कार्यक्रमाच्यासंदर्भात अधिक माहिती दिली नाही. ते म्हणाले की, त्यांचे भाषण झाल्यानंतर कार्यक्रम संपण्यापूर्वीच निघून गेले होते. त्यांनी कार्यक्रमात उपस्थित राज्यशास्त्र विभागातील शिक्षक डॉ. विकास जांभुळकर यांच्याशी विस्तृत माहिती घेण्यास सांगितली. डॉ. जांभुळकर यांच्याशी संपर्क केला असता, त्यांनी व्यस्त असल्याचे कारण सांगितले. ते म्हणाले की, कार्यक्रम पार पडला आहे. तिथे काय काय झाले, मला आठवत नाही.
माहिती घेऊन सांगेल
यासंंदर्भात विद्यापीठाचे प्रभारी कुलसचिव डॉ. नीरज खटी यांच्याशी संपर्क केला असता ते म्हणाले की, त्यांना कार्यक्रमाची माहिती नाही. माहिती घेतल्यानंतर काही प्रतिक्रिया देणे योग्य राहील.

 

Web Title: Nayantara Sahgal case: Nagpur University teachers will be punished

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.