मराठा आंदोलकांवरील लाठीहल्ला विरोधात राष्ट्रवादी आक्रमक, नागपुरात आंदोलन
By कमलेश वानखेडे | Published: September 4, 2023 06:01 PM2023-09-04T18:01:31+5:302023-09-04T18:04:39+5:30
व्हेरायटी चौकात नोंदवला निषेध
नागपूर : जालना येथे मराठा आंदोलकांवर झालेल्या लाठीचार्जच्या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे व्हेरायटी चौक गांधी पुतळा येथे सोमवारी आंदोलन करण्यात आले.
शहर अध्यक्ष दुनेश्वर पेठे यांच्या नेतृत्त्वात माजी महापौर शेखर सावरबांधे, अफजल फारुकी, जानबा मस्के, रमेश फुले, रेखा ताई कुपाले, नूतन रेवतकर, शैलेंद्र तिवारी, राजा बेग, मोरेश्वर जाधव, महेंद्र भांगे आदींनी गृह विभागा विरोधात घोषणाबाजी केली. यावेळी पेठे म्हणाले, आमचे सरकार येताच महिनाभरात आरक्षण देऊ असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले होते. मात्र, अद्याप मराठा समाजाला आरक्षण मिळालेले नाही. उलट मराठा आंदोलकांवर लाठीमार केला जात आहे. याचा निषेध नोंदवित सरकारने राजीनामा देण्याची मागणी त्यांनी केली.
आंदोलनात राजू सिंग चौहान, रिजवान अंसारी, तनुज चौबे, अर्शद सिद्दिकी, अशोक काटले, कपिल अवारे, अश्विन जवेरि, प्रशांत बनकर, निलेश बोरकर, वसीम लाला, आशुतोष बेलेकर, रुपेश बांगळे, सुनील लांजेवार, नंदु माटे, नागेश वानखेडे, शरद शाहू, राजा खान, विनोद कावळे, अर्शद अंसारी, नागेंद्र आठानकर, गजानन आष्टांनकर आदींनी भाग घेतला.