बलात्कार करायचा असेल तर वारांगणांवर करा, सुसंस्कृत घरातील महिलांवर नको; राष्ट्रवादीच्या महिला नेत्याचं वक्तव्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 8, 2022 02:42 PM2022-03-08T14:42:26+5:302022-03-08T15:04:27+5:30

जागतिक महिलादिनी नागपुरातील चंद्रशेखर आझाद चौकात वारांगणांनी पोलीस प्रशासनाच्या कारवाईचा निषेध नोंदवत आंदोलन केले.

ncp leader jwala dhote controversial statement on prostitution amid prostitute agitation in nagpur | बलात्कार करायचा असेल तर वारांगणांवर करा, सुसंस्कृत घरातील महिलांवर नको; राष्ट्रवादीच्या महिला नेत्याचं वक्तव्य

बलात्कार करायचा असेल तर वारांगणांवर करा, सुसंस्कृत घरातील महिलांवर नको; राष्ट्रवादीच्या महिला नेत्याचं वक्तव्य

googlenewsNext
ठळक मुद्देपोलीस कारवाईचा काळा निषेध नोंदवत वारांगणांचे आंदोलन

नागपूर : पोलीस आयुक्तांनी वारांगणांवर केलेल्या तडीपार कारवाईचा निषेध नोंदवत आज जागतिक महिला दिनी नागपुरात वारांगणांनी मानवी साखळी आंदोलन केले. यावेळी, बलात्कार करायचा असेल तर वारांगणांवर करा, पण नागपुरातील सुसंस्कृत घरातील महिलांवर बलात्कार करू नका, असं वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसच्या अर्बन सेलच्या अध्यक्षा व आंदोलनाचे ने ज्वाला धोटे यांनी केलं.

नागपुरातील चंद्रशेखर आझाद चौकात ज्वाला धोटे यांच्या नेतृत्वात हे आंदोलन करण्यात आले. यावेळी त्यांनी हे वक्तव्य केलं. पोलिसांनी नागपुरातील गंगा जमुना या रेड लाईट एरियावर कारवाई करत हा परिसर सील केला होता. दरम्यान, पोलीस आयुक्तांनी एका ६० वर्षीय महिलेवर तडीपारीची कारवाई केली. त्याचा निषेध करण्यासाठी या महिलांनी मानवी साखळी केली. आंदोलन चिघळू नये म्हणून पोलिसांचाही तगडा बंदोबस्त होता. 

ज्वाला धोटे यांनी या कारवाईचा पहिल्या दिवसांपासूनच तीव्र विरोध चालवला आहे. यावेळी महिलांवर अन्याय केला जात असल्याचे म्हणत ज्वाला धोटे आक्रमक झाल्या होत्या.

ज्वाला धोटे म्हणाल्या...

माझ्या समस्त वारांगणा माता भगिनी नराधमांना आवाहन करतात की बलात्कार करायचा असेल, शरीराची भूक भागवायची असेल तर आमच्याकडे या पण सुसंस्कृत घरांमधील माता-भगिनींवर वाईट नजर टाकू नका. नराधमांची शरीराची भूक भागवण्यासाठी आम्ही आहोत. पण सुसंस्कृत घरांमधील महिलांवर वाईट नजर टाकू नका, असं ज्वाला धोटे म्हणाल्या.

Web Title: ncp leader jwala dhote controversial statement on prostitution amid prostitute agitation in nagpur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.