राष्ट्रवादीने पाळला खोकेविरांच्या वर्षपूर्तीचा ‘गद्दार निषेध दिवस’, व्हेरायटी चौकात आंदोलन
By कमलेश वानखेडे | Published: June 20, 2023 02:41 PM2023-06-20T14:41:13+5:302023-06-20T14:44:40+5:30
'पन्नास खोके, एकदम ओके'च्या घोषणा
नागपूर : राज्यात वर्षभरापूर्वी धनशक्तीच्या भरशावर शिंदे-फडणवीस सरकार अस्तित्वात आले. पैशाचा भरवशावर लोकशाहीचा गळा घोटण्यात आला. या निषेध म्हणून मंगळवारी राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे ‘गद्दार निषेध दिवस’ पाळत व्हेरायटी चौकात आंदोलन करण्यात आले.
प्रदेश महासचिव शेखर सावरबांधे यांच्या नेतृत्त्वात झालेल्या या आंदोलनात ‘पन्नास खोके, एकदम ओके’च्या घोषणा देत नागरिकांचे लक्ष वेधण्यात आले. शिंदे गटाने शिवसेनेशी गद्दारी करीत धनशक्तीच्या आधारावर महाविकास आघाडीचे सरकार पाडले. लोकतांत्रित परंपरेला तडा देण्याचे काम केले. त्यामुळे आजचा हा काळा दिवस गद्दार दिवस म्हणून पाळण्यात येत आहे. नागरिकांनी हे लक्षात ठेवावे व आगामी निवडणुकीत याचा हिशेब चुकता करावा, असे अवाहान सावरबांधे यांनी यावेळी केले. आंदोलनात अफजल फारुखी, शैलेंद्र तिवारी, श्रीकांत घोगरे, लक्ष्मी सावरकर, राजा बेग, महेंद्र भांगे, मोरेश्वर जाधव, चिंटु महाराज, संतोष सिंग ठाकूर आदींनी भाग घेतला.