नागपूरच्या संत्र्यांसाठी शरद पवारांनी केला थेट चीनला फोन आणि मग...

By ऑनलाइन लोकमत | Published: November 15, 2019 06:13 PM2019-11-15T18:13:00+5:302019-11-15T18:39:07+5:30

पावसामुळे झालेल्या पीक नुकसानीची पाहणी शरद पवारांनी केली होती.

NCP Sharad Pawar calls China for Nagpur orange | नागपूरच्या संत्र्यांसाठी शरद पवारांनी केला थेट चीनला फोन आणि मग...

नागपूरच्या संत्र्यांसाठी शरद पवारांनी केला थेट चीनला फोन आणि मग...

googlenewsNext

नागपूर : नागपुरातील जगप्रसिद्ध संत्र्यांच्या मदतीसाठी राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार धावून आले. नागपूरचा संत्रा बऱ्याच देशात जातच नाही. चीनमध्ये देखील येथील संत्र्याची निर्यात होत नाही हे कळताच पवार यांनी चीनमधील भारतीय वाणिज्य समन्वयक प्रशांत लोखंडे यांनाच फोन लावला व संत्री निर्यातीविषयी पुढाकार घेण्याची सूचना केली. शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी पवारांनी तत्काळ पुढाकार घेतल्याचे पाहून उपस्थित शेतकरीही चांगलेच सुखावले. 

शरद पवार यांनी गुरुवारी नागपूर जिल्ह्यातील परतीच्या पावसामुळे झालेल्या पीक नुकसानीची पाहणी केली होती. यावेळी त्यांनी संत्रा बागांना भेटी देऊन गळालेल्या संत्र्यांचीही पाहणी करीत संत्री उत्पादकांना शासकीय मदत मिळण्याची गरज व्यक्त केली होती. यानंतर शुक्रवारी सकाळी पवार यांनी  रविभवन सभागृहात  संत्रा उत्पादक शेतकऱ्यांशी संवाद साधला. यावेळी संत्रा उत्पादकांनी त्यांचे प्रश्न मांडले. पवारांनी सर्वांचे म्हणणे ऐकून घेत यावर उपाय योजण्याचे आश्वासन दिले. 

यावेळी शेतकऱ्यांनी प्रायोरिटी प्रोटोकॉल लिस्टमध्ये नसल्याचे पवार यांना सांगितले. याची दखल घेत पवार यांनी चीनमधील भारतीय वाणिज्य समन्वयक प्रशांत लोखंडे यांना फोन करुन आवश्यक त्या सूचना केल्या. सोबतच महाऑरेंजचे श्रीधर ठाकरे व माजी मंत्री अनिल देशमुख यांचा भ्रमणध्वनी क्रमांक दिला. त्यानंतर काही वेळाने लोखंडे यांनी संबंधितांशी संपर्कही साधला. यानंतर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे माजी कुलगुरू शरद निंबाळकर, माजी मंत्री अनिल देशमुख, महाऑरेंजचे अध्यक्ष श्रीधर ठाकरे आदी पाच ते सहा जणांची एक समिती स्थापन करून संत्र्याबद्दल सविस्तर अहवाल तयार करण्याची सूचना पवार यांनी केली.

येत्या  १८ नोव्हेंबर रोजी संसदेचे हिवाळी अधिवेशन सुरू होत आहे. याकाळात संबंधित समितीच्या सदस्यांच्या शिष्टमंडळासह आपण स्वत: केंद्रीय अर्थमंत्रालय व कृषी मंत्रालयाच्या सचिवांसह अधिकाºयांची भेट घेऊन चर्चा करू, असेही पवार यांनी यावेळी स्पष्ट केले.

Web Title: NCP Sharad Pawar calls China for Nagpur orange

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.