Supriya Sule : सुप्रिया सुळे रविवारपासून तीन दिवसांच्या विदर्भ दौऱ्यावर
By कमलेश वानखेडे | Published: September 30, 2023 02:58 PM2023-09-30T14:58:45+5:302023-09-30T15:02:49+5:30
प्रमुख पदाधिकाऱ्यांसोबत बैठक घेवून पक्ष संघटनेचा आढावा घेणार
नागपूर : विदर्भातील निष्ठावंत कार्यकर्त्यांना एक नविन उर्जा देण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या खा. सुप्रिया सुळे या नागपूर, वर्धा, अमरावती या जिल्ह्यांचा दौरा करणार असून या दरम्यान त्या विविध ठिकाणी भेट देणार व काही मान्यवरांच्या भेटी घेणार आहेत. सोबतच तिन्ही जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकाऱ्यांसोबत बैठक घेवून पक्ष संघटनेचा आढावा घेणार आहेत.
१ ऑक्टोबर ते ३ ऑक्टोबर असा तीन दिवसांचा त्यांचा हा विदर्भ दौरा राहणार असून त्यांच्यासोबत पक्षाच्या महिला प्रदेश अध्यक्षा रोहिणी खडसे यांच्यासह पक्षाच्या विविध सेलचे प्रदेश पदाधीकारी सुद्धा उपस्थीत राहणार आहेत.
रविवारी त्यांचे नागपूर येथे आगमन होणार असून दुपारी १२.३० वाजता दिक्षाभुमीला भेट देणार आहेत. यानंतर स्वागत लॉन, सिव्हील लाईन येथे दुपारी २ वाजता पक्षाच्या प्रमुख पदाधिकारी यांच्यासोबत बैठक घेवून पक्ष संघटनेचा आढावा घेणार आहेत. स्वागत लॉन येथेच ६ वाजता पत्रकार परिषद घेवून नंतर शहरातील विविध समाविचार जेष्ठ विचावंतासोबत रविभवन येथे बैठक घेवून चर्चा करणार आहेत.
रविवारी त्यांना नागपूर येथेच मुक्काम असून २ ऑक्टोबर रोज सोमवारला त्या सकाळी वर्धा जिल्ह्याच्या दौऱ्यावर निघणार आहेत. सकाळी त्या ९ वाजता पवनार आश्रमाला भेट देतील. सकाळी १० वाजता सेवाग्राम येथील बापु कुटीला भेट देवून गांधी जयंती निर्मीत्य त्या महात्मा गांधी यांना अभिवादन करणार आहे. यानंतर सकाळी ११ वाजता जिल्हाधीकारी कार्यालय येथे जिल्ह्यातील प्रमुख अधिकाऱ्यांसोबत बैठक करणार आहेत. दुपारी १२ वाजता वर्धा येथील विश्राम गृहात त्या काही सामाजीक संघटनासोबत चर्चा करुन दुपारी २ वाजता वर्धा येथील सिव्हील लाईन स्थित महात्मा सभागृहात जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकारीऱ्यांसोबत बैठक घेवून पक्ष संघटनेचा आढावा घेणार आहेत. ४.३० वाजता पत्रकार परिषद घेवून नंतर जेष्ठ गांधीवादी नेते स्व. वसंतराव कारलेकर यांच्याकडे भेट देवून नंतर अमरावती येथे मुक्कामी जाणार आहेत.
३ ऑक्टोबर रोज मंगळवारला खा. सुप्रिया सुळे सकाळी ८.३० वाजता अंबादेवी व एकविरा देवीचे दर्शन घेवून सकाळी ११ वाजता कॅम्प रोडवील नविन शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या पक्ष कार्यालयाचे उध्दाटन करणार आहेत. येथेच त्या पत्रकार परिषद घेवून दुपारी १२ वाजता राजापेठ येथील शहर युवक राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयाचे उद्घाटन करतील. दुपारी २ वाजता संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक भवन मोर्शी रोड येथे पक्षाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक घेवून पक्ष संघटनेचा आढावा घेणार आहेत. नंतर त्या नागपूर येथे येवून पुण्याकडे रवाना होणार आहेत.