भाजपाविरोधात राष्ट्रवादी युवक काँग्रेसची निदर्शने
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 13, 2020 11:01 PM2020-01-13T23:01:30+5:302020-01-13T23:02:36+5:30
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची तुलना छत्रपती शिवाजी महाराज यांच्याशी केल्याच्या विरोधात राष्ट्रवादी युवक काँग्रेसतर्फे भाजपाविरोधात निदर्शने करण्यात आली.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची तुलना छत्रपती शिवाजी महाराज यांच्याशी केल्याच्या विरोधात राष्ट्रवादी युवक काँग्रेसतर्फे भाजपाविरोधात निदर्शने करण्यात आली. महाल येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर हे आंदोलन करण्यात आले. राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष शैलेंद्र तिवारी यांच्या नेतृत्वात हे आंदोलन झाले.
‘आज के शिवाजी नरेंद्र मोदी’ या पुस्तकावर तत्काळ बंदी आणावी. तसेच पुस्तक लिहिणारे भाजप पदाधिकारी भगवान गोयल यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली. यावेळी नूतन रेवतकर, महेंद्र भांगे, सुरेश करने, अनिल बोकडे, अमोल पारपल्लीवार, सरवर अन्सारी, नीरज तवानी, तौसिफ शेख, राजेश मासूरकर, विक्रम परिहार, आशीष वर्मा, शुभम टेकाडे, चंद्रकांत नाईक, रवी यादव, रिजवान अन्सारी, नितीन वजेकर, चेतन सदन, विलास मालके, संदीप मेंढे, शिव भेंडे, रमेश काळे, प्रवीण देवीकर,याकूब खान, नंदकिशोर नंदनवार, सय्यद शाहबाज, शाहरुख सय्यद, रवी मारशेट्टीवार, राहुल, डोंगरे, अश्विन पक्खीडे, जावेद खान, इस्माईल अन्सारी, रिजवान मन्सूरी, शाकीर पठाण, विशाल खरे, हेमंत डोरले, गौरव पवार, अनिल अकोटकर, मोहित नामदेव प्रामुख्याने उपस्थित होते.
शिवसेना
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबरोबर तुलना करणाऱ्या पुस्तकाविरु द्ध शिवसेनेनेसुद्धा निदर्शने केली. शिवसेनेसोबतच युवा सेना व वाहतूक सेनाचे पदाधिकारीही आंदोलनात सहभागी होते. हा छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान असून, हा अपमान सहन केला जाणार नाही, असा इशाराही यावेळी देण्यात आले. आंदोलनात माजी नगरसेवक गणेश डोईफोडे व जगतराम सिन्हा, युवसेना उपजिल्हा प्रमुख आकाश पांडे, वाहतूक सेनाचे गौरव गुप्ता यांनी आंदोलनाचे नेतृत्व केले. आंदोलनात संदीप पटेल, धीरज फंदी, अक्षय मेश्राम, सलमान खान, नीलेश तिघरे, महेंद्र कठाणे, श्याम तेलंग, आशिष बोकडे, रूपेश बागडे, रतन मेश्राम, अंकित शाहू आदींचा समावेश होता.