नागपुरात पाण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचा हल्लाबोल 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 19, 2019 12:49 AM2019-07-19T00:49:35+5:302019-07-19T00:50:23+5:30

शहरातील भीषण जलसंकटामुळे नागरिकांमध्ये असंतोष पसरला आहे. याअंतर्गत राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे शहराध्यक्ष अनिल अहिरकर आणि आ. प्रकाश गजभिये यांच्या नेतृत्वात गुरुवारी दुपारी मनपा मुख्यालयासमोर तीव्र आंदोलन करण्यात आले. यावेळी मडके फोडून निषेध व्यक्त करण्यात आला. मनपा आयुक्त अभिजित बांगर यांना निवेदन सादर करण्यात आले. गेल्या दहा वर्षात मनपा जलव्यवस्थापनात अपयशी ठरल्यामुळेच पाण्याचे संकट उभे ठाकले असल्याचा आरोपही यावेळी करण्यात आला.

NCP's attack for water in Napur | नागपुरात पाण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचा हल्लाबोल 

नागपुरात पाण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचा हल्लाबोल 

Next
ठळक मुद्देमनपा मुख्यालयासमोर आंदोलन : मडके फोडून केला निषेध

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : शहरातील भीषण जलसंकटामुळे नागरिकांमध्ये असंतोष पसरला आहे. याअंतर्गत राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे शहराध्यक्ष अनिल अहिरकर आणि आ. प्रकाश गजभिये यांच्या नेतृत्वात गुरुवारी दुपारी मनपा मुख्यालयासमोर तीव्र आंदोलन करण्यात आले. यावेळी मडके फोडून निषेध व्यक्त करण्यात आला. मनपा आयुक्त अभिजित बांगर यांना निवेदन सादर करण्यात आले. गेल्या दहा वर्षात मनपा जलव्यवस्थापनात अपयशी ठरल्यामुळेच पाण्याचे संकट उभे ठाकले असल्याचा आरोपही यावेळी करण्यात आला.
निवेदनात म्हटले आहे की, शहरातील नागरिक जलसंकटाचा सामना करीत आहेत. पाण्याची कपात सुरू झाली आहे. मनपाने टँकर मुक्तीचा दावा केला होता. परंतु आजही शहरात १०० टँकर फिरत आहेत. ओसीडब्ल्यूसुद्धा २४ तास पाणी पुरवठा करण्याचा दावा पूर्ण करू शकलेले नाही. वरून लोकांकडून अधिक बिल वसूल केले जात आहे. मनपाच्या अकार्यक्षमतेमुळे ७५ टक्के विहिरी ड्रेनेज लाईनमुळे दूषित झाल्या आहेत.
आंदोलनात माजी आमदार दीनानाथ पडोळे, दिलीप पनकुले, धनराज फुसे, बजरंग सिह परिहार , वेद प्रकाश आर्य, जानबा मस्के, चरणजीत सिंह चौधरी, श्रीकांत शिवणकर, विशाल खांडेकर , अशोक काटले , देवीदास घोड़े, मिलिंद मानापुरे, शैलेश पांडे, नागेश देडमुठे, रवि पराते, विश्वनाथ डोर्लीकर, एकनाथ फलके, राजेश शुक्ला, महबूब पठाण, जावेद शेख, प्यारूभाई, नंदकिशोर महेश्वरी, प्रमिला ताई टेंबेकर, स्वप्निल अहिरकर, रोशन भिमटे, राहुल कांबळे, अरविंद ढेंगरे, सुनील बुजबटकर,धनंजय देशमुख, प्रकाश लिखाणकर, जतीन झाड़े, दीपक बंगाले आदी सहभागी होते.

Web Title: NCP's attack for water in Napur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.