एसएनडीएल विरोधात राष्ट्रवादीचा एल्गार

By admin | Published: July 29, 2016 02:56 AM2016-07-29T02:56:00+5:302016-07-29T02:56:00+5:30

महागाईमुळे सर्वसामान्य नागरिक त्रस्त आहेत. त्यातच नागपूर शहराला वीज पुरवठा करणाऱ्या एसएनडीएलच्या भोंगळ कारभारामुळे ...

NCP's Elgar against SNDL | एसएनडीएल विरोधात राष्ट्रवादीचा एल्गार

एसएनडीएल विरोधात राष्ट्रवादीचा एल्गार

Next

संविधान चौकात बिलाची होळी : कार्यक र्त्यांना अटक
नागपूर : महागाईमुळे सर्वसामान्य नागरिक त्रस्त आहेत. त्यातच नागपूर शहराला वीज पुरवठा करणाऱ्या एसएनडीएलच्या भोंगळ कारभारामुळे प्रचंड प्रमाणात वीज बिल वाढले आहे. वाढीव बिल कमी करून या कंपनीच्या विरोधात राज्य सरकारने कारवाई करावी. यासाठी माजीमंत्री अनिल देशमुख यांच्या नेतृत्वात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतर्फे गुरुवारी संविधान चौकात निदर्शने करण्यात आली. यावेळी संतप्त नागरिकांनी वाढीव बिलाची होळी करून सरकारच्या धोरणाचा निषेध केला.
कार्यकर्त्यांनी रास्ता रोको आंदोलन करण्याचा प्रयत्न केला असता राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे विदर्भ प्रमुख सलील देशमुख यांच्यासह कार्यक र्त्यांना पोलिसांनी अटक केली. नंतर अनिल देशमुख यांच्या नेतृत्वातील शिष्टमंडळाने विभागीय आयुक्त अनुपकुमार यांना निवेदन देऊ न एसएनडीएलच्या विरोधात कारवाई करण्याची मागणी केली.
कंपनीने पुढील तीन वर्षात ३० ते २०० टक्के वीज दरवाढ प्रस्तावित केली आहे. वीज बिलाची आकारणी करण्यासाठी एसएनडीएलने लावलेले वेगवेगळ्या पाच कंपन्यांचे मीटर सदोष आहेत. झोपडपट्टीधारकांना दोन-दोन हजारांचे बिल येत आहे. यापूर्वी राज्यात आघाडीचे सरकार असताना सदोष मीटर अहमदाबादला तपासणीसाठी पाठविण्यात येत होते. त्यात दोष आढळल्यास ग्राहकांना भरपाई दिली जात होती. परंतु भाजप सरकार सत्तेवर आल्यानंतर ही प्रक्रिया बंद झाली आहे. एसएनडीएलकडे तक्रार आल्यास ते महावितरणकडे जबाबदारी असल्याचे सांगतात तर महावितरण एसएनडीएलकडे बोट दाखविते. यामुळे ग्राहकांची आर्थिक लूट सुरू असल्याचा आरोप देशमुख यांनी केला. भाजपने लोकांना दिलेल्या आश्वसनाची पूर्तता करून एसएनडीएलला हद्दपार करावे. अशी मागणी त्यांनी निवेदनातून केली आहे.
आंदोलनात माजी आमदार दीनानाथ पडोळे, मनपातील माजी गटनेते वेदप्रकाश आर्य, अनिल अहिरकर, नगरेवक दुनेश्वर पेठे, राजू नागुलवार, ईश्वर बाळबुधे, दिलीप पनकुले, पुरुषोत्तम वाडीघरे, नुतन रेवतकर, रेखा कृपाले, जावेद हबीब, महेंद्र भांगे, नरेंद्र पुरी, विनोद हेडाऊ, रमन ठवकर, सुखदेव वंजारी, गिरीष ग्वालबंशी, सुरेश बारापात्रे, आय.के.पाशा, अनिल खडगी, कादीर शेख,अशोक अडीकने, दिनेश त्रिवेदी, जावेद खान, शैलेंद्र तिवारी, दिनकर वानखेडे, इखरा खान, अलका कांबळे, जानबा मस्के, स्वनील खापेकर, राजेंद्र बढीये, विद्या सेलुकर, प्रशांत बनकर, राजेश आत्राम, गोपाल ठाकूर यांच्यासह शेकडो कार्यकर्ते सहभागी झाले होते. (प्रतिनिधी)

Web Title: NCP's Elgar against SNDL

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.