निवडणुकीवर नजर ठेवून राष्ट्रवादीची जम्बो नागपूर शहर कार्यकारिणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 17, 2021 11:48 AM2021-07-17T11:48:51+5:302021-07-17T11:50:20+5:30

Nagpur News महापालिकेच्या आगामी निवडणुकीवर नजर ठेवून राष्ट्रवादी काँग्रेसने शुक्रवारी जम्बो शहर कार्यकारिणी जाहीर केली.

NCP's Jumbo Nagpur city executive keeping an eye on the elections | निवडणुकीवर नजर ठेवून राष्ट्रवादीची जम्बो नागपूर शहर कार्यकारिणी

निवडणुकीवर नजर ठेवून राष्ट्रवादीची जम्बो नागपूर शहर कार्यकारिणी

googlenewsNext
ठळक मुद्देचार विधानसभा अध्यक्ष बदलले २८ महासचिव, ३४ उपाध्यक्ष, २८ सचिव

 लोकमत न्यूज नेटवर्क 
नागपूर : महापालिकेच्या आगामी निवडणुकीवर नजर ठेवून राष्ट्रवादी काँग्रेसने शुक्रवारी जम्बो शहर कार्यकारिणी जाहीर केली. निवडणुकीपूर्वी संघटन बांधणीचा प्रयत्न करतानाच जुन्या कार्यकारिणीतील चार विधानसभा अध्यक्षांनाही बदलण्यात आले आहे.

शहराध्यक्ष दुनेश्वर पेठे यांनी पक्षाचे ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल यांच्या उपस्थितीत कार्यकारिणीची घोषणा केली. कार्यकारिणीत २८ महासचिव, ३४ उपाध्यक्ष, २८ सचिव, १४ संघटन सचिव व ३ सहसचिव नियुक्त करण्यात आले आहेत. ९ जणांना कार्यकारिणी सदस्य, तर तिघांवर प्रवक्तापदाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. निवडणुकीच्या तोंडावर पक्ष विस्तारासाठी सर्वांना सामावून घेण्याचा प्रयत्न करीत असतानाच जुन्या चार विधानसभा अध्यक्षांना बदलण्यात आले आहे. उत्तर नागपूरचे अध्यक्ष विशाल खांडेकर, पूर्वचे रवींद्र इटकेलवार, दक्षिणचे अशोक काटले व मध्य नागपूरचे मिलिंद मानापुरे यांना शहर कार्यकारिणीत स्थान देण्यात आले आहे. प्रवक्ता श्रीकांत शिवणकर यांच्यासह सतीश इटकेलवार, नूतन रेवतकर व संतोष सिंह हे नवे प्रवक्ते नेमले आहेत.

पक्षात आलेल्यांना संधी

- पेठे यांच्यावर विश्वास ठेवून राष्ट्रवादीत प्रवेश घेतलेल्यांना कार्यकारिणीत सामावून घेण्यात आले आहे. गुलशन मुनियार यांना पूर्व नागपूर अध्यक्ष योगेश न्यायखोर यांना कार्याध्यक्षपदी नियुक्त केले आहे. शिवसेनेतून आलेले रविनीश पांडेय व काँग्रेसमधून घरवापसी केलेले रमण ठवकर यांना उपाध्यक्षपदी संधी देण्यात आली आहे.

Web Title: NCP's Jumbo Nagpur city executive keeping an eye on the elections

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.