नागपुरातील  वि.बा.प्रभुदेसाई काळाच्या पडद्याआड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 2, 2018 08:51 PM2018-05-02T20:51:31+5:302018-05-02T20:52:01+5:30

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या मराठी विभागाचे माजी प्रमुख, मराठी साहित्याचे सुप्रसिद्ध समीक्षक व संशोधक डॉ. वि. बा. प्रभुदेसाई (८६) यांचे मंगळवारी पुणे येथे निधन झाले. त्यांच्या अध्यापकीय, प्रशासकीय व संशोधकीय कर्तृत्वामुळे मराठी विभागाला महाराष्ट्रभर मोठी प्रतिष्ठा प्राप्त झाली होती. विद्यार्थीप्रिय प्राध्यापक म्हणून त्यांची ख्याती होती.

Near the footprint of V.Prabhudesai era in Nagpur | नागपुरातील  वि.बा.प्रभुदेसाई काळाच्या पडद्याआड

नागपुरातील  वि.बा.प्रभुदेसाई काळाच्या पडद्याआड

Next
ठळक मुद्दे१५ वर्षे होते मराठी विभागप्रमुख : विद्यार्थीप्रिय प्राध्यापक म्हणून होता लौकिक

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या मराठी विभागाचे माजी प्रमुख, मराठी साहित्याचे सुप्रसिद्ध समीक्षक व संशोधक डॉ. वि. बा. प्रभुदेसाई (८६) यांचे मंगळवारी पुणे येथे निधन झाले. त्यांच्या अध्यापकीय, प्रशासकीय व संशोधकीय कर्तृत्वामुळे मराठी विभागाला महाराष्ट्रभर मोठी प्रतिष्ठा प्राप्त झाली होती. विद्यार्थीप्रिय प्राध्यापक म्हणून त्यांची ख्याती होती.
विद्यापीठाच्या मराठी विभागामध्ये ते ६ जुलै १९६४ रोजी अधिव्याख्याता म्हणून रुजू झाले होते. पुढे त्यांनी विभागामध्ये २० जून १९७७ ते ३१ जानेवारी १९९२ पर्यंत मराठी विभागाचे विभागप्रमुख म्हणून कार्य केले होते. त्यांचे एकूण १४ ग्रंथ प्रसिद्ध झाले होते. त्याचप्रमाणे शंभरहून अधिक संशोधनात्मक लेखदेखील प्रकाशित झाले होते. विदर्भ संशोधन मंडळाचेदेखील ते आजीवन सदस्य होते.
मराठी विभागातर्फे आदरांजली
डॉ. वि. बा प्रभुदेसाई यांना आदरांजली वाहण्यासाठी विद्यापीठाच्या स्नातकोत्तर मराठी विभागामध्ये बुधवारी शोकसभेचे आयोजन करण्यात आले. या शोकसभेच्या अध्यक्षस्थानी स्नातकोत्तर मराठी विभागाचे माजी विभागप्रमुख व साहित्यिक डॉ. यशवंत मनोहर हे होते. याशिवाय अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष डॉ. अक्षयकुमार काळे, अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष डॉ. श्रीपाद भालचंद्र जोशी, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज अध्यासनाचे प्रमुख डॉ. प्रदीप विटाळकर, साहित्यिका डॉ. जुल्फी शेख प्रामुख्याने उपस्थित होते. यावेळी मान्यवरांनी डॉ.वि.बा.प्रभुदेसाई यांच्याबाबत शोकसंवेदना व्यक्त केल्या. डॉ.मनोहर यांनी प्रभुदेसाई यांची कारकिर्द,त्यांची विशेषता, कार्याची हातोटी इत्यादी मुद्यांवर आपल्या भाषणातून प्रकाश टाकला. शोकसभेला
मराठीव्यतिरिक्त इतर विभागांचे प्रमुखदेखील उपस्थित होते. यात अर्थशास्त्र विभागप्रमुख डॉ. स्नेहा देशपांडे, राज्यशास्त्र विभागप्रमुख डॉ. मोहन काशीकर, समाजशास्त्र विभागप्रमुख डॉ. बी. के. स्वाईन् यांचा समावेश होता. विद्यापीठाचे मराठी विभागप्रमुख डॉ. शैलेंद्र लेंडे, डॉ. प्रमोद मुनघाटे, डॉ. कोमल ठाकरे, डॉ. राजेंद्र वाटाणे, डॉ. मिलिंद साठे, प्रा. रेणुकादास उबाळे, डॉ. भारती खापेकर, प्रा. संजय सिंगणजुडे, डॉ. महेश जोगी, डॉ. प्रज्ञा निनावे, प्रा. मनोज कोसारे, प्रा. आस्तिक गोवारकर यांचीदेखील उपस्थिती होती. डॉ.कोमल ठाकरे यांनी संचालन केले. विदर्भ संशोधन मंडळातर्फेदेखील त्यांच्या निधनाबाबत शोकसंवेदना व्यक्त करण्यात आल्या आहेत.

Web Title: Near the footprint of V.Prabhudesai era in Nagpur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.