आवश्यकतेनुसार होणाऱ्या संशोधनाचा स्थानिकांना लाभ व्हावा - गडकरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 29, 2022 05:49 PM2022-04-29T17:49:39+5:302022-04-29T18:00:15+5:30

स्व. दादासाहेब काळमेघ उत्कृष्ट संशोधक पुरस्कार वितरणप्रसंगी ते बोलत होते.

Necessary research should benefit the locals says nitin gadkari | आवश्यकतेनुसार होणाऱ्या संशोधनाचा स्थानिकांना लाभ व्हावा - गडकरी

आवश्यकतेनुसार होणाऱ्या संशोधनाचा स्थानिकांना लाभ व्हावा - गडकरी

Next
ठळक मुद्देस्व. दादासाहेब काळमेघ उत्कृष्ट संशोधक पुरस्कार प्रदान

नागपूर : विदर्भात कापूस आहे; पण संशोधन नाही, कोळसा आहे; पण संशोधन नाही, संत्रा आहे; पण त्यावर प्रक्रिया करणारे उद्योग नाहीत. ज्या प्रदेशात ज्या वस्तूंचे अधिक उत्पादन आहे, त्या उत्पादनांवर संशोधन करून मूल्यवर्धन करण्यास प्राधान्य द्यावे. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे आवश्यकतेनुसार होणाऱ्या संशोधनाचा स्थानिकांना लाभ झाला पाहिजे, असे मत केंद्रीय भूपृष्ठ वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केले.

स्व. दादासाहेब काळमेघ उत्कृष्ट संशोधक पुरस्कार वितरणप्रसंगी ते बोलत होते. देशात संशोधन करण्याच्या खूप संधी आणि क्षमताही असून हा देशाला आत्मनिर्भर करण्याचा मार्ग आहे. ज्ञानाचे व कचऱ्याचे मूल्यवर्धन करून संपत्तीत रूपांतर करणे हे भविष्यासाठी आवश्यक आहे. संशोधन आणि विकासाची देशाला मदत होऊ शकते. आपल्याकडे संशोधकही आहे. सर्वच क्षेत्रांत आवश्यकतेनुसार संशोधन करण्याची गरज आहे. संशोधनासोबतच विज्ञान, तंत्रज्ञान, कौशल्य या चतु:सूत्रीचा योग्य वापर झाल्यास देशाच्या प्रगतीला चालना मिळून देश प्रत्येक क्षेत्रात आत्मनिर्भर होऊ शकेल. यासाठी संशोधनाला प्रोत्साहन मिळाले पाहिजे. हे संशोधन खासगी संशोधन संस्थांच्या माध्यमातून व्हावे. संशोधनातून यश मिळाले नाही म्हणून खचून जाण्याची आवश्यकता नाही, असे गडकरी म्हणाले.

यावेळी माजी केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर, डॉ. वेदप्रकाश मिश्रा, स्व. दादासाहेब काळमेघ दंत महाविद्यालयाच्या संशोधन सल्लागार समितीचे अध्यक्ष डॉ. जी. डी. यादव, डॉ. शर्मा, अनंत घारड, अरुण लखानी, शरद काळमेघ, हेमंत काळमेघ प्रामुख्याने उपस्थित होते.

सीएसआर फंड एक टक्क्याने वाढवून संशोधनावर खर्च व्हावा

देशात संशोधन संस्कृती रुजल्यास सुपर पॉवर होण्याचे स्वप्न वास्तवात साकारणे शक्य आहे. यासाठी सीएसआर फंड (सामजिक दायित्व निधी) २ वरून ३ टक्क्यांवर नेण्यात यावा. यातील एक टक्का फंड केवळ संशोधनावर खर्च करण्यात यावा, असे आवाहन माजी केंद्रीय मंत्री खा. प्रकाश जावडेकर यांनी केले.

Web Title: Necessary research should benefit the locals says nitin gadkari

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.