तूरडाळीच्या किमतीवर नियंत्रणाची गरज
By admin | Published: April 11, 2016 02:41 AM2016-04-11T02:41:04+5:302016-04-11T02:41:04+5:30
होळीपासून आजपर्यंत तूरडाळीच्या किमतीत क्विंटलमागे तब्बल १७०० ते १८०० रुपयांची वाढ झाली. दरवाढीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.
मोरेश्वर मानापुरे, नागपूर
होळीपासून आजपर्यंत तूरडाळीच्या किमतीत क्विंटलमागे तब्बल १७०० ते १८०० रुपयांची वाढ झाली. दरवाढीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. पण उत्पादनाच्या तुलनेत मागणी जास्त असल्यामुळे भाववाढ झाल्याचे व्यापाऱ्यांचे मत आहे. शासनाने लागलीच नियंत्रण आणले नाही तर तूरडाणीचे भाव गतवर्षीप्रमाणे आकाशाला भिडण्याची शक्यता आहे.
यंदा २७ मार्चपासून दर आठवड्याला क्लिंटलमागे ५०० रुपयांची दरवाढ होत आहे. प्रारंभी ठोक बाजारात उच्च प्रतिची तूर डाळीची किंमत ११६ ते १२० रुपये किलो होती. पण होळीत डाळ मीलमध्ये कामगारांअभावी उत्पादन चार ते पाच दिवस ठप्प राहिले, तर दुसरीकडे अचानक मागणी वाढली. हेच कारण भाववाढीसाठी महत्त्वाचे ठरले. शनिवारी ठोक बाजारात १३० ते १३६ रुपये किलो होते. किरकोळमध्ये भाव १४० ते १५० रुपयादरम्यान आहेत. गेल्यावर्षी तूर डाळीचे भाव २०० रुपयांवर गेले होते, हे विशेष.
कमी मान्सूनमुळे तूरीचे पीक कमी असल्याचे कारण पुढे न करता व व्यापाऱ्यांना दोष न देता कठोर निर्णय घेण्याची गरज असल्याचे मत धान्य बाजाराचे समीक्षक रमेश उमाटे यांनी लोकमतशी बोलताना व्यक्त केले.