कारखाने, बांधकाम साईटजवळ प्रभावी वायूप्रदूषण नियंत्रणाची गरज : नीरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 3, 2021 04:07 AM2021-07-03T04:07:12+5:302021-07-03T04:07:12+5:30

नागपूर : उद्याेगक्षेत्र, कारखाने तसेच बांधकाम साईटजवळ वायूप्रदूषण नियंत्रणासाठी प्रभावी सिस्टीमची गरज आहे आणि त्यासाठी पर्णसांभार असलेल्या झाडांची ...

Need for effective air pollution control near factories, construction sites: Neeri | कारखाने, बांधकाम साईटजवळ प्रभावी वायूप्रदूषण नियंत्रणाची गरज : नीरी

कारखाने, बांधकाम साईटजवळ प्रभावी वायूप्रदूषण नियंत्रणाची गरज : नीरी

Next

नागपूर : उद्याेगक्षेत्र, कारखाने तसेच बांधकाम साईटजवळ वायूप्रदूषण नियंत्रणासाठी प्रभावी सिस्टीमची गरज आहे आणि त्यासाठी पर्णसांभार असलेल्या झाडांची त्या भागात लागवड करणे आवश्यक असल्याचे मत नीरीच्या तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे.

नागपूर महापालिकेने राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी संशाेधन संस्था (नीरी) साेबत शहरातील वायू प्रदूषण कमी करण्यासाठी माेहीम हाती घेतली आहे. नुकतेच महापाैर दयाशंकर तिवारी यांनी नीरीच्या टीमसाेबत प्रदूषण स्तर अधिक असलेल्या भागामध्ये विशिष्ट प्रजातीच्या झाडांची लागवड करण्याच्या नियाेजनावर चर्चा केली. लाेकमतने नीरीचे प्रदूषण आणि वृक्षाराेपण तज्ज्ञांची प्रकल्पाविषयी मते जाणून घेतली. नीरीच्या पद्मा राव व डाॅ. लाल सिंग यांनी, पर्णसांभार अधिक असलेले, वायू प्रदूषण साेशनाची क्षमता असलेले, वातावरणातील कार्बन साेशून पाणी वाचविणारी, मुळे बांधण्याची क्षमता असलेली तसेच कमी पाणी लागणारी झाडे लागवड करण्याची गरज आहे. यामध्ये स्नेक प्लॅन्ट, ॲलाेविरा, बाभूळ, कदम, कडूलिंब, गुलमाेहर, अशाेक तसेच कायम हरीत राहणारी झाडे, झुडपे, गवत अशा धूळ साेशणारे पर्णसांभार असलेल्या झाडांचा समावेश असताे. शहरी वातावरणात वायू प्रदूषण, धूळ व ध्वनिप्रदूषणही कमी करण्यात झाडे महत्त्वाची भूमिका बजावतात. झाडांची लागवड केली तरीही त्यांना वाढायला वेळ लागताे. डाॅ. लाल सिंग म्हणाले, काेणत्या प्रकारची झाडे लावण्यासाेबत त्यांची काळजी घेणे महत्त्वाचे आहे. एकदा ती वाढली की त्याचे परिणाम चांगलेच येतात. रस्ते दुभाजक, रस्त्याच्या कडेला, पायवाटेच्या शेजारी व उद्यानात वृक्षाराेपण करणे आवश्यक आहे.

केवळ वृक्षाराेपण हा एकमेव पर्याय नाही तर इतर टप्पेही महत्त्वाचे आहेत. पद्मा राव म्हणाल्या, वायू प्रदूषण नियंत्रण सिस्टिमद्वारे प्रदूषण कमी करावे लागेल. हरित अंत्यसंस्कार व माेबाईल उर्त्सजन निरीक्षणही आवश्यक आहे. रस्त्यावरील धूळ नियंत्रणासह बांधकाम व ताेडण्यादरम्यान हाेणाऱ्या धुळीच्या उत्सर्जनावर नियंत्रण तसेच स्वयंपाक चुलीवरील धुराच्या उत्सर्जनाबाबत सुधारणा करण्याची गरज पद्मा राव यांनी व्यक्त केली. गर्दीतील घुसमट राेखण्यासाठी रस्ते रुंदीकरण, उद्याेगांसाठी साैर ऊर्जेचा उपयाेग करणे, कारखान्यांजवळ ग्रीन बेल्ट तयार करणे आणि उद्याेग क्षेत्रात प्रभावी वायू प्रदूषण सिस्टीम लावणे महत्त्वाचे असल्याचे डाॅ. लाल सिंग म्हणाले.

पर्यावरणवादी काैस्तुभ चटर्जी यांनी सांगितले, नागपुरात धुलीकण (पीएम२.५ व पीएम१०) हे प्रदूषणाचे माेठे कारण आहे. हे बांधकाम प्रक्रियेमुळे धुलीकणांच्या प्रदूषणात वाढ झाली आहे. त्यामुळे धुलीकण व कार्बन साेशणारे, प्राणवायू साेडणारे व ध्वनी प्रदूषणही साेशून घेणारी झाडे लावणे आवश्यक आहेत. मात्र नागपूरसारख्या शहरात २० च्यावर हवा निरीक्षण स्टेशन असणे आवश्यक आहे. विविध प्रकल्पामुळे नागपूरचे ग्रीन कव्हर घटत चालले आहे, त्यामुळे ते वाढविण्यासाठी उपाय करणे आवश्यक असल्याचे चटर्जी यांनी आवर्जून सांगितले.

पर्णसांभार व वायू प्रदूषण साेशण्याची क्षमता असलेली झाडे

बाभूळ, बेल, महारुक, चितवन, कदम, लिंब, शिशम, गुलमाेहर, वड, पाकर, पिंपळ, अशाेक, आम्रा, जांभूळ, चिंच, बाेर आदी.

Web Title: Need for effective air pollution control near factories, construction sites: Neeri

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.