कर्करोगावर नव्या पद्धतीने निदानाची गरज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 13, 2020 04:26 AM2020-12-13T04:26:43+5:302020-12-13T04:26:43+5:30
नागपूर : कर्करोगाचे पहिल्या टप्प्यातच निदान झाल्यास उपचारातील यशाचा टक्का वाढतो. यासाठी नव्या निदान पद्धतची निर्मिती करणे गरजेचे आहे, ...
नागपूर : कर्करोगाचे पहिल्या टप्प्यातच निदान झाल्यास उपचारातील यशाचा टक्का वाढतो. यासाठी नव्या निदान पद्धतची निर्मिती करणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन केंद्रीय रस्ते वाहतूक आणि केंद्रीय सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योगमंत्री नितीन गडकरी यांनी आज येथे केले.
राष्ट्रसंत तुकडोजी प्रादेशिक कर्करोग रुग्णालय व संशोधन केंद्र येथे ‘न्यू इलेक्ट्रा वर्सा एचडी’ लिनिअर एक्सिलेटर या अद्ययावत रेडिएशन यंत्राचे गडकरी यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून पशुसंवर्धन विकास मंत्री सुनील केदार, विभागीय आयुक्त डॉ. संजीव कुमार उपस्थित होते.
या रुग्णालयात जेवढी यंत्रसामुग्री आहे त्याच्या हाताळणीसाठी ‘एमएसएमई’मार्फत प्रशिक्षण अभ्यासक्रम राबवावेत. त्यामुळे विद्यार्थ्यांना रोजगार मिळेल आणि केंद्रालाही लाभ होईल, असे गडकरींनी यावेळी सुचविले. कर्करोगाच्या रुग्णांसाठी रुग्णालयाने घेतलेल्या पुढाकाराचे सुनील केदार यांनी कौतुक केले.
रेडिओलॉजी विभागाचे डॉ. करतार सिंग यांनी यंत्राची माहिती दिली. कार्यक्रमाला अशोक कृपलानी, डॉ. बी. के. शर्मा, डॉ. करतार सिंग, रणधीर जवेरी, अवतराम चावला, अनिल मालविया आदी उपस्थित होते.