माेवाड शहरात विलगीकरण कक्षाची गरज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 25, 2021 04:08 AM2021-04-25T04:08:21+5:302021-04-25T04:08:21+5:30

लाेकमत न्यूज नेटवर्क माेवाड : माेवाड (त. नरखेड) शहर नागपूर-अमरावती जिल्ह्याच्या तसेच महाराष्ट्र व मध्य प्रदेशच्या सीमावर्ती भागात असून, ...

Need for segregation room in Maewad city | माेवाड शहरात विलगीकरण कक्षाची गरज

माेवाड शहरात विलगीकरण कक्षाची गरज

Next

लाेकमत न्यूज नेटवर्क

माेवाड : माेवाड (त. नरखेड) शहर नागपूर-अमरावती जिल्ह्याच्या तसेच महाराष्ट्र व मध्य प्रदेशच्या सीमावर्ती भागात असून, शहर व परिसरातील गावांमध्ये काेराेना संक्रमण झपाट्याने वाढत आहे. यातील बहुतांश रुग्णांना गृहविलगीकरणात राहण्याचा सल्ला दिला जात असून, अनेकांकडे ती साेय नसल्याने ते कुटुंबीयांसह इतरांच्या संपर्कात येत असल्याने संक्रमण वाढत आहे. ते राेखण्यासाठी माेवाड शहरात किमान १०० खाटांचे विलगीकरण कक्ष तयार करावे, अशी मागणी युवासेनेच्या पदाधिकाऱ्यांसह रुग्णाचे कुटुंबीय व नागरिकांनी केली असून, या विलगीकरण कक्षामुळे परिसरातील २६ गावांमधील रुग्णांची साेय व संक्रमण कमी हाेण्यास मदत हाेणार असल्याचे त्यांनी सांगितले.

माेवाड शहराची लाेकसंख्या आठ हजाराच्या वर असून, येथील प्राथमिक आरोग्य केंद्राला परिसरातील २६ गावे जाेडली आहेत. या प्राथमिक आराेग्य केंद्रातील तीन डाॅक्टरांची नियुक्ती असली तरी, यातील एक डाॅक्टर नरखेड येथील ग्रामीण रुग्णालयात प्रतिनियुक्तीवर आहे. अन्य एका डाॅक्टरला काेराेनाची लागण झाल्याने सध्या या आराेग्य केंद्राचा भार डाॅ. संजय साेळंके या एकमेव डाॅक्टरवर आहे. या प्राथमिक आराेग्य केंद्रांतर्गत काेराेनाचे एकूण ६२७ रुग्ण आढळून आले असून, यातील ३८३ रुग्णांनी काेराेनावर मात केली तर, २४४ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत. यात माेवाड शहरातील ३७ तर परिसरातील गावांमधील २०१ ॲक्टिव्ह रुग्णांचा समावेश आहे.

माेवाड शहर व परिसरातील रुग्णांना उपचारासाठी नागपूर किंवा अमरावतीला न्यावे लागते. ही दाेन्ही शहरे माेवाडपासून १२५ ते १६५ किमी अंतरावर आहे. या शहरांमधील रुग्णालयात खाटा उपलब्ध हाेत नसल्याने रुग्णाला परत आणावे लागते. यात रुग्ण दगावण्याचीही दाट शक्यता असते, शिवाय शहरातील रुग्णालयावर रुग्णांचा ताण वाढताे. विलगीकरण कक्षात ही साेय केल्यास शहरातील रुग्णालयावरील ताण थाेडा कमी हाेईल तसेच रुग्णांवर वेळीच उपचार मिळतील. त्यामुळे माेवाड शहरात विलगीकरण कक्ष तयार करण्याची मागणी युवासेनेचे ललित खंडेलवाल, रुग्णांचे कुटुंबीय व नागरिकांनी केली आहे.

...

४,४७३ नागरिकांचे लसीकरण

माेवाड प्राथमिक आराेग्य केंद्रात २,३१४ आरटीपीसीआर तर, ३,६८० रॅपिड ॲन्टिजेन टेस्ट करण्यात आल्या, शिवाय ४५ वर्षांवरील ४,४७३ नागरिकांचे लसीकरण करण्यात आले. काही ॲक्टिव्ह रुग्णांकडे विलगीकरणासाठी स्वतंत्र साेय नसल्याने, ते इतरांच्या संपर्कात येतात आणि इतरही नागरिक काेराेनाबाधित हाेतात. माेवाड येथे स्वतंत्र विलगीकरण कक्ष तयार केल्यास शहरासह परिसरातील गावांमधील रुग्णांची साेय हाेणार असून, या कक्षात ५० ऑक्सिजन बेडची व्यवस्था करावी, अशी मागणीही करण्यात आली आहे.

...

Web Title: Need for segregation room in Maewad city

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.