आधुनिक तंत्रज्ञानाला विरोध न करता स्वदेशी व स्वावलंबनाची जोड देण्याची गरज : नितीन गडकरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 28, 2022 01:42 PM2022-06-28T13:42:03+5:302022-06-28T13:44:13+5:30

येणाऱ्या काळात भारतीय अर्थव्यवस्था ही आयात करणारी नाही, तर निर्यात करणारी झाली पाहिजे. असे झाले तरच भारत आर्थिकदृष्ट्या सक्षम होईल, असेदेखील गडकरी म्हणाले.

Need to combine indigenous and self-reliant without opposing modern technology says Nitin Gadkari | आधुनिक तंत्रज्ञानाला विरोध न करता स्वदेशी व स्वावलंबनाची जोड देण्याची गरज : नितीन गडकरी

आधुनिक तंत्रज्ञानाला विरोध न करता स्वदेशी व स्वावलंबनाची जोड देण्याची गरज : नितीन गडकरी

Next

नागपूर : ‘इंधन क्षेत्रात मागील काही काळापासून मोठा बदल झाला आहे. आज इथेनॉलवर चालणारे जनरेटर आले असून, वाहने इथेनॉलवर चालवली जात आहेत. इलेक्ट्रिक बसेसदेखील बाजारात आल्या आहेत. पेट्रोल व डिझेलचे पंप बंद करून त्याजागी इथेनॉलचे व इलेक्ट्रिक वाहनांसाठी चार्जिंग स्टेशन निर्माण करायचे आहे,’ असे प्रतिपादन केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी केले. स्वदेशी जागरण मंचाचे माजी अ. भा. संयोजक प्रा. योगानंद काळे यांच्या ‘स्वदेशी एक चिंतन’ या पुस्तकाचे प्रकाशन झाले. यावेळी ते बोलत होते.

आधुनिक तंत्रज्ञानाला विरोध न करता त्याला स्वदेशी आणि स्वावलंबनाची जोड देण्याची गरज आहे. येणाऱ्या काळात भारतीय अर्थव्यवस्था ही आयात करणारी नाही, तर निर्यात करणारी झाली पाहिजे. असे झाले तरच भारत आर्थिकदृष्ट्या सक्षम होईल, असेदेखील गडकरी म्हणाले.

भारतीय संस्कृती आणि इतिहास हा भारतीय विचारधारेशी संबंधित आहे. स्वदेशी विचारांना तंत्रज्ञानाची जोड देण्याची आवश्यकता आहे. विदेशी तंत्रज्ञानाला विरोध न करता ते आपल्याकडे कसे विकसित होईल आणि त्याला स्वदेशी व स्वावलंबनाची जोड कशी देता येईल, यादृष्टीने विचार करावा. कृषी क्षेत्रात स्वदेशीचा प्रचार स्वदेशी जागरण मंचाने करावा, असे आवाहन गडकरी यांनी केले. यावेळी डॉ. विनायक देशपांडे, शिरीष तारे, धनंजय भिडे, सुधीर दिवे प्रामुख्याने उपस्थित होते.

Web Title: Need to combine indigenous and self-reliant without opposing modern technology says Nitin Gadkari

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.