प्राण गेला तरी नाणार नाही म्हणजे नाहीच - नीलम गोऱ्हे
By ऑनलाइन लोकमत | Published: July 11, 2018 09:51 PM2018-07-11T21:51:29+5:302018-07-11T21:51:55+5:30
नाणार प्रकल्प आमच्या परिसरात नको यासाठी रत्नागिरी जिल्ह्यातील नाणार गावातील रहिवासी यांनी नागपूर येथे येऊन यशवंत मैदानावर धरणे आंदोलन केले. या आंदोलकांची भेट आ. डॉ. नीलम गोऱ्हे यांनी घेतली.
नागपूर : नाणार प्रकल्प आमच्या परिसरात नको यासाठी रत्नागिरी जिल्ह्यातील नाणार गावातील रहिवासी यांनी नागपूर येथे येऊन यशवंत मैदानावर धरणे आंदोलन केले. या आंदोलकांची भेट आ. डॉ. नीलम गोऱ्हे यांनी घेतली. यावेळी त्या म्हणाला की, कोकणवासीयांच्या पाठीशी शिवसेना ठामपणे उभी आहे. त्यामुळे प्राण गेला तरी नाणार प्रकल्प होऊ देणार नाही. तसेच, सभागृहात शिवसेनेने मांडलेल्या भूमिकांची माहिती त्यांनी आंदोलनात सहभागी जनतेला दिली.
नीलम गो-हे यांनी दिलेली माहिती...
- माधव गाडगीळ समितीने हा परिसर इको सेन्सिटिव्ह घोषित केला आहे.
- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहामध्ये नाणार प्रकल्प लादणार नाही, असे स्पष्ट केले आहे. तसेच पर्यावरणावर काय परिणाम ते तपासणार आहेत.
- मुख्यमंत्री यांनी विधानपरिषदेत रिफायनरी प्रकल्प हा भारताच्या पश्चिम किनारपट्टीवर करण्यासाठी झाला आहे.
- सुभाष देसाई यांनी नाणार येथील जमीन अधिग्रहण थांबविण्यात यावे याबाबत ठराव दिला हे मुख्यमंत्री यांनी मान्य केले. तसेच जमीन अधिग्रहण करण्याचा निर्णय माझ्या अखत्यारीत असल्याने मुख्यमंत्री यावर निर्णय घेणार आहेत. त्यामुळे शिवसेना ही कोकणवासीयांच्या सोबत आहे हे पाहिल्यानंतर शिवसेनेवर टिककरणाऱ्यांची तोंडे बंद झाली आहेत.
- जसा रायगड सेझ, पुणे दाऊ प्रकल्प रद्द केले तसा हाही रद्द करू, शिवसेना स्थानिक नागरिकांच्या पाठीशी उभी राहिली आहे.
- कुठल्याही परीस्थितीत हा प्रकल्प होऊ देणार नाही अशी भूमिका पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी घेतली होती. त्यामुळे तुम्ही निश्चिंत रहा शिवसेना तुमच्या पाठीशी आहे.
यावेळी रविंद्र वायकर रत्नागिरी पालकमंत्री, आ.सुनील प्रभू, स्थानिक आमदार राजन साळवी, आ.सदानंद चव्हाण, आ.वैभव नाईक, आ.प्रताप सरनाईक, आ.अजय चौधरी, आ.विलास पोतनीस, आ.प्रकाश आबीटकर, आ.प्रकाश फातर्पेकर हे उपस्थित होते.