नीरीची सलाईन गारगल किट आता खुल्या बाजारात ()

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 4, 2021 04:06 AM2021-07-04T04:06:28+5:302021-07-04T04:06:28+5:30

नागपूर : नीरीच्या संशाेधकांनी काेराेना विषाणूच्या चाचणीसाठी विकसित केलेले सलाईन गारगल (गुळणी) तंत्राचे किट आता खुल्या बाजारात विक्रीसाठी उपलब्ध ...

Neerichi Saline Gargle Kit Now Open Market () | नीरीची सलाईन गारगल किट आता खुल्या बाजारात ()

नीरीची सलाईन गारगल किट आता खुल्या बाजारात ()

Next

नागपूर : नीरीच्या संशाेधकांनी काेराेना विषाणूच्या चाचणीसाठी विकसित केलेले सलाईन गारगल (गुळणी) तंत्राचे किट आता खुल्या बाजारात विक्रीसाठी उपलब्ध करण्यात आले आहे. एका मराठी कंपनीने या तंत्राचे अधिकार घेतले असून व्यावसायिक वापराला ‘डीसीजीए’ची मान्यता मिळाल्यानंतर त्याचे किट तयार केले आहे.

राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी संशाेधन संस्था (नीरी)च्या व्हायरालाॅजी विभागाचे प्रमुख डाॅ. क्रिष्णा खैरनार यांच्या नेतृत्वात व्यक्तीच्या गुळणीतून काेराेना विषाणूच्या चाचणीचे तंत्र विकसित केले आहे. सलाईन गारगलच्या पद्धतीवर जगभरातील वैज्ञानिकांद्वारे संशाेधन करीत हाेते पण नीरीच्या वैज्ञानिकांनी त्यात यश मिळविले. नीरीने त्याचे किट विकसित करून त्याचा १९ मे राेजी आयसीएमआरची मान्यता मिळाली व यशस्वी चाचणी सुरू करण्यात आली. एवढेच नाही तर नागपूरसह मुंबई, पुणे आदी शहरातील खासगी संस्थांच्या प्रयाेगशाळांमध्ये तपासणीची मान्यता दिली. आता या शासकीय संस्थेच्या संशाेधनाला व्यावसायिक मान्यता मिळाल्याने माेठे यश मानले जात आहे.

नीरीच्या प्रयत्नानंतर ‘ड्रग कन्ट्राेलर जनरल अथॉरिटी’ आणि फूड ॲन्ड ड्रग्स विभागाने सलाईन गारगल चाचणी किटच्या व्यावसायिक विक्रीला परवानगी दिली. यानंतर ‘हायमीडिया’ या महाराष्ट्रीयन कंपनीला किटच्या विक्री व वितरणाचे अधिकार देण्यात आले असून कंपनीने ते सुरू केले आहे.

सलाईन गारगल विकासाच्या घडामाेडी

- या तंत्रांतर्गत रुग्णाने १५ सेकंद गुळणी केल्यानंतर त्याचे सॅम्पल जारमध्ये जमा केले जाते.

- त्यामध्ये नीरीने तयार केलेले द्रव्य (बफर साेल्युशन) मिसळले जाते.

- हे बफर साेल्युशन या संशाेधनाचा महत्त्वाचा भाग आहे. सध्या प्रचलित आरटी-पीसीआर पद्धतीत विषाणूचा आरएनए तपासण्यासाठी आरएनए एक्सट्रॅक्शनची गरज हाेती. बफर साेल्युशनने ही गरजच संपविली आहे.

- या चाचणीमुळे खर्च व वेळ दाेन्हीची बचत हाेणार आहे. आरटीपीसीआर चाचणीत रिपाेर्ट येण्यासाठी दुसऱ्या दिवशीची वाट पाहावी लागते पण सलाईन गारगल तंत्राने तीन तासात रुग्णाचा रिपाेर्ट प्राप्त हाेताे.

- इंडियन कौन्सिल फाॅर मेडिकल ॲन्ड रिसर्च (आयसीएमआर) कडून १९ मे २०२० राेजी मान्यता मिळाली.

- नागपूर महापालिकेच्या सहकार्याने नीरीद्वारे आरपीटीएस केंद्रावर २९ मे पासून चाचणी सुरू करण्यात आली व आतापर्यंत २००० च्यावर नागरिकांची या पद्धतीने यशस्वीपणे तपासणी करण्यात आली आहे.

- दरम्यान, एम्सने स्वत:चे संशाेधन असल्याचा दावा केल्याने वाद उफाळला हाेता पण ते अपयशी ठरले.

हायमीडियाने दिला विश्वास

सलाईन गारगल चाचणी किट तयार करून बाजारात उपलब्ध करण्यात आली असल्याचे ‘हायमीडिया’चे संचालक डाॅ. विशाल वारके यांनी सांगितले. किट, साेल्युशन व एजेंट मिळून २५ ते २८ रुपयात ती उपलब्ध करण्यात आली आहे. हायमीडिया ही औषधांसह अन्न, कृषी, डेअरी व वेगवेगळ्या लसींचे मीडियम विकसित करणारी जगातील तिसऱ्या क्रमांकाची कंपनी आहे. काेराेनाचे विषाणू तपासणी करण्यासाठी वापरली जाणारी व्हीटीएम किट, ॲडव्हान्स व्हीटीएलएम किट, ॲन्टीबाॅडी तपासणीसाठी उपयाेगी एलायझा किट, काेविड सेफ किट, आरएनए एक्स्ट्रॅक्शन किट कंपनीने तयार केले आहेत. कमी किमतीत आंतरराष्ट्रीय दर्जाचे मीडियम देण्याचा विश्वास डाॅ. वारके यांनी दिला.

Web Title: Neerichi Saline Gargle Kit Now Open Market ()

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.