वैद्यकीय प्रवेशाची ‘नीट’ ७ मे राेजी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 3, 2023 09:21 PM2023-05-03T21:21:01+5:302023-05-03T21:21:46+5:30
Nagpur News नॅशनल टेस्टिंग एजन्सी (एनटीए) द्वारे घेण्यात येणारी वैद्यकीय अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी आवश्यक ‘नॅशनल इलिजिबिलिटी कम एंट्रन्स टेस्ट-२०२३’ (नीट) ची परीक्षा येत्या ७ मे राेजी घेण्यात येणार आहे.
नागपूर : नॅशनल टेस्टिंग एजन्सी (एनटीए) द्वारे घेण्यात येणारी वैद्यकीय अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी आवश्यक ‘नॅशनल इलिजिबिलिटी कम एंट्रन्स टेस्ट-२०२३’ (नीट) ची परीक्षा येत्या ७ मे राेजी घेण्यात येणार आहे. देशभरातील ४९९ आणि देशाबाहेरील १४ शहरांमध्ये परीक्षेचे केंद्र निर्धारित करण्यात आले असून, दुपारी २ वाजता ही परीक्षा हाेणार आहे.
‘नीट’ची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना आता परीक्षेच्या प्रवेशपत्राची प्रतीक्षा असून, ते एनटीएच्या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात येतील व विद्यार्थ्यांना ती डाऊनलाेड करून परीक्षा केंद्रावर पाेहोचावे लागेल. परीक्षा केंद्राच्या शहराव्यतिरिक्त दुसऱ्या शहरात, ग्रामीण भागात राहणाऱ्या विद्यार्थ्यांना परीक्षेकरिता प्रवासाची पूर्वतयारी करता यावी म्हणून सिटी स्लीप म्हणजे शहरांची माहिती देण्यात आली आहे. त्यानुसार विद्यार्थी परीक्षेपूर्वी केंद्रावर हजर राहतील. विद्यार्थ्यांना त्यांच्या साेयीनुसार शहर निवडण्याची संधीही ‘एनटीए’कडून देण्यात आली हाेती. त्यानुसार शहर आणि परीक्षा केंद्र देण्यात आली आहेत. सिटी स्लीप म्हणजे प्रवेशपत्र नव्हेत, असे एजन्सीकडून स्पष्ट करण्यात आले आहे. प्रवेशपत्र लवकरच संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात येतील. नागपूरसह विदर्भातील हजाराे विद्यार्थी नीटची तयारी करीत आहेत.